
कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथील गणेश पशुखाद्य उद्योग समूहाचे युवा उद्योजक केशव घोडके यांच्या पुढाकारातून आणि हिंदुस्तान कॅटल फिड्सच्या माध्यमातून माहिजळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी शैक्षणिक मदत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अडवलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा आदर्श कार्य समाजातील प्रत्येक घटकांनी हाती घेतले पाहिजे. शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम अभिनव असा आहे. हा उपक्रम केवळ एक मोहीम न बनता त्याची व्यापक चळवळ व्हावी असे प्रतिपादन युवा उद्योजक केशव घोडके यांनी केले.

या पुढील काळात देखील अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून यंदाच्या वर्षी हिंदुस्तान कॅटल फिड्सच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा माहिजळगाव येथील तब्बल २०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी उपस्थित हिंदुस्तान कॅटल फिड्सचे अधिकारी विश्वजीत जगताप, विनायक बागल, प्रतीक निंबोरे, ग्रामपंचायत सदस्य दादा शिंदे, मुख्याध्यापक विलास सोमवंशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शेटे, स्वप्निल टकले, सुभाष लवांडे, शिक्षिका अनिता राठोड, कालिदास क्षीरसागर, स्वाती जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
युवा उद्योजक केशव घोडके यांच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळावे, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप असे अनेक व सामाजिक उपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यांच्या स्तुत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी