कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष सुरवसे

कर्जत : प्रा. किरण जगताप

अहिल्यानगर कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष सुरवसे तर व्हॉइस चेअरमन पदी अल्ताफ शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. मुटकुळे यांनी काम पाहिले. नूतन चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना चेअरमन व व्हाईस चेअरमन म्हणाले की, सर्व सभासदांनी मिळून आम्हाला काम करण्याची संधी दिली त्या संधीचं आम्ही निश्चित सोनं करून दाखवू.

यावेळी माजी व्हॉइस चेअरमन संजय सोनवणे, मोतीराम रहाणे, विजय सोमवंशी, गणेश जगदाळे, अनिलकुमार शेजुळ, जयश्री कुटे, कविता मदने, राजेश तूंभारे, सुकदेव जमधडे, गोरक्षनाथ पठाडे, नितीन चौरे, कैलास बुंदले, सार्थक दहिवळे आणि सर्व सभासद उपस्थित होते.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी