
कृषी उत्पन्न बाजार समिती, कर्जत यांच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या भुसार मार्केट उपबाजाराचे उद्घाटन रविवार, दि. ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी बांधव, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, उपसभापती अभय पाटील व संचालकांनी केले आहे.

