
कर्जत तालुका व परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा संदेश देताना बागल सर्विसेसचे सर्वेसर्वा व केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे सीनियर सेल्स ऑफिसर महेंद्र बागल यांनी सांगितले की आजच्या काळात प्रत्येक कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स करणे अत्यावश्यक झाले आहे. वाढते वैद्यकीय खर्च, अचानक होणारे आजार व अपघात यामुळे आर्थिक संरक्षणासाठी हेल्थ इन्शुरन्स हा सर्वात आवश्यक आधार आहे.

महेंद्र बागल म्हणाले फक्त विमा घेणेच नव्हे तर नोकरी, व्यवसाय, शेती अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांनी पार्ट-टाईम कमाई म्हणूनही हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात प्रवेश करणे हा आजच्या काळातील उत्तम निर्णय ठरू शकतो. या क्षेत्रात प्रचंड वाढ असून पार्ट-टाईम आणि फुल-टाईम दोन्ही प्रकारे काम करून उत्तम कमाई, आर्थिक स्थैर्य आणि समाजसेवा करण्याची मोठी संधी आहे.

ते पुढे म्हणाले की बागल सर्विसेस मार्फत लोकांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून आधुनिक प्रशिक्षण, डिजिटल साधने आणि करिअर वाढीच्या उत्तम संधी यामुळे युवक, महिला, नोकरदार व उद्योजकांसाठी हे क्षेत्र अतिशय उपयुक्त आहे.


शेवटी महेंद्र बागल यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की प्रत्येक कुटुंबाने हेल्थ इन्शुरन्स करून आर्थिक सुरक्षेचे कवच तयार करावे. तसेच ज्यांना प्रगतीची इच्छा आहे त्यांनी या क्षेत्रात सामील होऊन उज्ज्वल भविष्य घडवावे. हेल्थ इन्शुरन्स हा फक्त व्यवसाय नाही तर तो समाजासाठी दिलेली एक महत्त्वपूर्ण सेवा आहे.


