अळसुंदे येथे हेल्थ इन्शुरन्सचे मार्गदर्शन शिबिर संपन्न

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथे दि.१८ जानेवारी २०२६ रोजी हेल्थ इन्शुरन्सचे मार्गदर्शन शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिराला अळसुंदे गावातील ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे सीनियर सेल्स ऑफिसर व बागल सर्विसेसचे सर्वेसर्वा महेंद्र बागल यांनी नागरिकांना हेल्थ इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा घ्यावा, कोणता प्लॅन योग्य ठरेल तसेच हेल्थ इन्शुरन्सचे महत्त्व याविषयी सविस्तर व सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले.

तसेच प्रा. संकेत आजबे यांनी हॉस्पिटल खर्च व वैद्यकीय महागाई कशा पद्धतीने वाढत आहे याबाबत माहिती दिली तर सचिन गाडे यांनी हेल्थ इन्शुरन्स संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अविनाश काळदाते यांनी केले.

या शिबिरासाठी अमित सुपेकर, डॉ. मनोजकुमार भोसले तसेच अळसुंदे गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व शेवटी आभार प्रदर्शन संतोष अनारसे यांनी केले.
हा मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामीण भागात हेल्थ इन्शुरन्स विषयी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला.