कर्जत तालुक्यात युरियाचा तुटवडा, लिंकिंग प्रश्नावर भाजपाचे निवेदन

कर्जत : प्रा. किरण जगताप

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील तालुका कृषी अधिकारी यांना भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नंदलाल काळदाते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले की, तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये युरियाची मागणी शेतकऱ्यांकडून केली असता त्यांना तुटवड्याचे कारणे सांगितले जात आहेत.

जरी युरिया दिला तरी शेतकऱ्यांना युरिया बरोबर लिंकिंग करून इतर खते घेण्यास भाग पाडले जात आहे. त्यांची किंमत युरिया खतापेक्षाही जास्त होत आहे. अगोदरच कर्जत तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे पहिल्या पिकास मुकला असून सध्याच्या विकास शेतकऱ्यांची अशाप्रकारे पिळावणूक होताना दिसत आहे.

आपल्याकडून याबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीची कृती होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर प्रत्येक कृषी सेवा केंद्राकडे असणारा बफर स्टॉकविषयी माहिती मिळणे आवश्यक आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष अनिल गदादे, भाजपा नेते दादासाहेब सोनमाळी, भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा तालुकाध्यक्ष दत्ता नलवडे, हर्षल शेवाळे, शरद मेहेत्रे, स्वप्निल तोरडमल, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके, रोहित ढेरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी