
कर्जत येथील राशीन रोड लगत दि.२६ जानेवारी २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या एचपी माऊली पेट्रो स्टेशनला येत्या २६ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. अल्पावधीतच ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळवत या पेट्रो स्टेशनने एका वर्षात तब्बल ३४.७ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

माऊली पेट्रो स्टेशनचे संचालक अक्षय राऊत यांनी पहिल्या वर्षात मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ग्राहकाभिमुख सेवा, शुद्ध व उच्च दर्जाचे एचपी इंधन आणि विविध सवलती यामुळे माऊली पेट्रो स्टेशन अल्पकाळातच परिसरात विश्वासाचे केंद्र बनले आहे.

माऊली पेट्रो स्टेशनमध्ये पेट्रोल व डिझेल खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एचपीच्या माध्यमातून पेमेंट केल्यास प्रत्येकी १०० रुपयांमागे १ रुपया कॅशबॅक देण्यात येत आहे. तसेच मोठ्या ग्राहकांना प्रति लिटर १.५० रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. चांगल्या मायलेजची हमी देणारे एचपीचे उच्च गुणवत्ता असलेले शुद्ध इंधन येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.


हे पेट्रो स्टेशन २४ तास सेवा देत असून सर्व प्रकारची डीटीपी कार्ड सुविधा तसेच विविध डिजिटल पेमेंट पर्याय येथे उपलब्ध आहेत. यासोबतच ग्राहकांसाठी मोफत नायट्रोजन सेवा सुद्धा देण्यात येत आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिक या सर्व सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत.

ग्राहकांच्या विश्वासावर उभे राहिलेले एचपी माऊली पेट्रो स्टेशन आगामी काळातही अधिक दर्जेदार व नाविन्यपूर्ण सेवा देण्याचा संकल्प असल्याचे संचालक अक्षय राऊत यांनी सांगितले.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी

