तिरुपती पत्रा कंपनीचा आज पहिला वर्धापन दिन

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन रोड, लकी हॉटेलजवळ, कर्जत येथे दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू केलेल्या तिरुपती पत्रा कंपनी या नवीन व्यवसायाला दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आपल्या स्थापनेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करत दुसऱ्या वर्षात दमदार पदार्पण केले आहे. अल्पावधीतच गुणवत्ता, विश्वासार्हता आणि ग्राहकसेवेमुळे कंपनीने बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तिरुपती कंपनीचे संचालक प्रथमेश नानाशेठ शिंदे यांनी सांगितले की, ग्राहकांचा विश्वास आणि गुणवत्तेवर आधारित सेवा हेच आमच्या यशाचे प्रमुख सूत्र आहे. पहिल्या वर्षात मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तसेच भविष्यात उत्पादनक्षमता वाढवणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि अधिकाधिक ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

तिरुपती पत्रा कंपनीच्या या यशस्वी वाटचालीमुळे औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात कंपनी आणखी उंच भरारी घेईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.