
कर्जत तालुक्यातील सोनाळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बाळासाहेब गणपत काळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या माध्यमातून ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन शनिवार दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे करण्यात आले होते.

कर्जत तालुक्यातून या कार्यक्रमाकरिता बाळासाहेब गणपत काळे यांची निवड संस्थेने केली होती. संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाळासाहेब गणपत काळे यांचा आदर्श सरपंच म्हणून सन्मान करण्यात आला.


बाळासाहेब गणपत काळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिक आणि सोनाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी

