बागल सर्विसेसकडून युवकांना ‘हेल्थ इन्शुरन्स’ व्यवसायात उतरण्याचे आवाहन

कर्जत : प्रा. किरण जगताप

ग्रामीण भागातील युवकांनी रोजगार आणि समाजसेवा या दुहेरी उद्देशाने हेल्थ इन्शुरन्स सारख्या विश्वासार्ह व्यवसायात उतरावे असे आवाहन बागल सर्विसेसकडून करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना केअर हेल्थ इन्शुरन्सचे एसएसओ महेंद्र बागल यांनी सांगितले की, हेल्थ इन्शुरन्स हा फक्त व्यवसाय नसून तो समाजसेवेचा मार्ग आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, गोरगरीब मजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांना अडचणीच्या वेळी आर्थिक आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या क्षेत्रातून करता येते.

त्यांनी पुढे सांगितले की, आज अनेक युवक बेरोजगार आहेत किंवा मर्यादित उत्पन्नावर काम करत आहेत. अशा युवकांनी हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात साईड बिझनेस किंवा फुल टाइम करिअर म्हणून संधी स्वीकारल्यास त्यांना चांगले उत्पन्न, सन्मान आणि प्रगतीची संधी मिळू शकते. योग्य प्रशिक्षण, परिपूर्ण नॉलेज आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्यास या व्यवसायात मोठे यश मिळवता येते.
या व्यवसायाच्या माध्यमातून युवकांची आर्थिक प्रगती होण्यासोबतच समाजात विश्वासार्ह ओळख निर्माण होते. तसेच इंटरनॅशनल टूर आणि विविध सन्मान मिळवण्याची संधीही उपलब्ध होते.

शेवटी महेंद्र बागल यांनी आपल्या भागातील युवकांना खुले आवाहन केले की, हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात काम सुरू करा, स्वतःचे भविष्य घडवा आणि समाजसेवेचा अभिमान बाळगा.
इच्छुक युवकांनी बागल सर्विसेसशी संपर्क साधून मार्गदर्शन व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.