काष्टीतील टॉपर्स अकॅडेमीचे ‘जेईई मेन्स – २०२६’ मध्ये दैदीप्यमान यश

कर्जत : प्रा. किरण जगताप

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या ‘जेईई मेन्स २०२६’ (सत्र १) परीक्षेत टॉपर्स अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत शिवम शितोळे (९८.९९), आर्या शेळके (९८.९३) आणि मयूर यादव (९८.९२) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अकॅडेमीचा लौकिक वाढवला.
तसेच द्रोण लगड, अनुराधा हराळ आणि भूमी काळे या विद्यार्थ्यांनी ९८ पेक्षा अधिक पर्सेंटाईल, तर अभिषेक काशिद, शुभम कळमकर आणि दीप लगड यांनी ९७ पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवले. यासोबतच पायल कुरुमकर, सार्थक टकले, भक्ती जाधव, यशराज गरुड, रोहित गव्हाणे, सिद्धेश थोरात, गौरव शेळके, अनुष्का थोरात, राधा रोडे, ओंकार वेताळ, हर्षराज चौधरी आणि शुभम काळे या विद्यार्थ्यांनी ९४ पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवत घवघवीत यश संपादन केले.
अकॅडेमीच्या २२ पैकी २१ विद्यार्थ्यांनी ९४ पेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळवल्याने ग्रामीण भागात ‘टॉपर्स अकॅडेमी’ने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संस्थेचे संचालक प्रा. गणेश कळसकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, आगामी एप्रिल सत्रासाठी अधिक मेहनत घेण्याचे आवाहन केले आहे.