स्वीय सहाय्यक डॉ. संतोष यादव यांनी केला सचिन धांडेंचा सत्कार

कर्जत : प्रा. किरण जगताप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. संतोष यादव यांच्या हस्ते शिवसेना तालुका संघटक प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सचिन धांडे यांचा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी संतोष यादव, राशीन येथील जय फॅब्रिकेशनचे मालक माऊली कदम, तसेच स्वंस्कार इंटरप्राइजेसचे संचालक प्रा. विशाल म्हेत्रे यांनीही शिवसेना तालुका संघटक प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सचिन धांडे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना डॉ. संतोष यादव यांनी सचिन धांडे यांच्या कार्याची विशेष दखल घेतली. त्यांनी सांगितले की सचिन धांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून संघटनात्मक कामात सक्रिय असून त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्या मेहनतीची दखल घेत त्यांची संघटक प्रमुखपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शिवसेना अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच त्यांनी पुढे सांगितले की पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करताना युवकांना संघटनेशी जोडणे, विविध सामाजिक उपक्रम राबवणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे ही जबाबदारी सचिन धांडे यांच्यावर अधिक वाढली आहे. त्यांनी या जबाबदारीचे उत्तमपणे पालन करून पक्षाचे नाव उंचावावे अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.