माणुसकी जपणारा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ : सभापती प्रा. राम शिंदे

सभापती प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक बहिरोबावाडी येथील बंटी यादव यांना शुक्रवारी कॉल आला आणि ‘मी आपल्याकडे येतोय’ असे सांगितले अन् प्रा. शिंदे यांनी रात्री यादव यांची फार्महाऊसवर भेट घेतली. सभापती शिंदे यांनी यादव मित्रपरिवारासमवेत त्यांनी स्नेह जपला. नेत्याने अचानक भेट दिल्याने कार्यकर्त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. यादव परिवार आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रा. राम […]

Continue Reading

कर्जतमधील पिंक पेटल्स क्युरिअस किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक मंथन परीक्षेमध्ये कर्जत – वालवड रोडनजीकच्या स्वामी समर्थ मंदिरामागील पिंक पेटल्स क्युरिअस किड्स या प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेचे नाव उज्वल केले आहे. यामध्ये इयत्ता दुसरीतील सुयोग हुमे याने मंथन परीक्षेत केंद्रात प्रथम, राज्यात पंधरावा तर […]

Continue Reading

संस्कृती टिकवण्यासाठी ‘माता’ ; जीवसृष्टी वाचवण्यासाठी ‘माती’ अत्यावश्यक

माता आणि माती पुन्हा मिळणार नाहीत. त्यामुळे पुढच्या पिढीने आपली संस्कृती जपली पाहिजे. संस्कृती टिकवण्यासाठी ‘माता’ आणि जीवसृष्टी वाचवण्यासाठी ‘माती’ अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी केले. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे साई बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘स्वाभिमानी माऊली पुरस्कार वितरण व कीर्तन सोहळा’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात कार्य […]

Continue Reading

कर्जत नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव ; सोमवारची प्रतीक्षा !

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांच्याविरोधात नव्या अध्यादेशाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावामुळे जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी कर्जतचे प्रांताधिकारी पाटील यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच नगराध्यक्षा अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी कर्जत नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर्वी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चौकशी […]

Continue Reading

रेहेकुरी शाळेचे विद्यार्थी मंथन व लक्षवेध परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत

दरवर्षी घेण्यात येणाऱ्या मंथन व लक्षवेध परीक्षांमध्ये रेहेकुरी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. शाळेतील दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, तर दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. यामध्ये इयत्ता पाचवीतील समृद्धी महेश मांडगे हिने मंथन परीक्षेत राज्यात तिसरा, तर लक्षवेध परीक्षेत अकरावा क्रमांक मिळवला […]

Continue Reading

‘गौरी शुगर’ने ऊस बिल थकवले ; कर्जत तालुक्यातील शेतकरी …

ओंकार शुगर ग्रुपच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याने चालू ऊस गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे दोन महिन्यांपासून ऊस बिल थकवले आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून या कारखान्याने उसाचे बिल थकवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे तातडीने मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित लढा देण्याची भूमिका घेतली आहे. युवक […]

Continue Reading

प्रा. राम शिंदे यांची संवेदनशीलता ; कंत्राटी कामगाराच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

कोविड काळात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळवून देण्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कर्मचारी कै. दादासाहेब झुंबर श्रीराम हे पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांचा कोविड काळात मृत्यू झाला. कोविड काळात स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचारी कर्तव्य बजावत असताना […]

Continue Reading

कर्जतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कर्जत तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भास्कर भैलूमे मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या स्मृतीला […]

Continue Reading

न्यायाधीश राज नलगे यांचा खेडमध्ये नागरी सन्मान

कर्जत तालुक्यातील खेड येथील सुपुत्र राज पोपट नलगे यांनी स्पर्धा परीक्षेतून न्यायाधीशपद मिळवून गावाचे नाव उज्वल केले. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी खेडमध्ये नागरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी लोकनायक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत मोरे भावनिक शब्दांत मार्गदर्शन करत म्हणाले, राज, तू न्यायाधीश झालास, याचा अभिमान आहे. पण आता शाळेत येत राहा, विद्यार्थ्यांना […]

Continue Reading

भांबोऱ्यातील चिमुकल्यांच्या नृत्याविष्कारांनी पालकांची मने जिंकली

कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी देशभक्तिपर गीत, शेतकरी गीत, कोळी गीत, गोंधळ गीत, समाजप्रबोधनपर व विनोदी नाटिका, तसेच विविध नृत्य आदी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन भांबोरा गावच्या सरपंच विद्याताई जगताप, उपसरपंच दीपक लोंढे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश लोंढे, उपाध्यक्ष सचिन माने, […]

Continue Reading