कर्जत पोलिसांची गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

कर्जत पोलीस स्टेशनच्या पथकाने गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत दोन पिकअप वाहनांसह जनावरे जप्त केली. दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे सव्वा सहा वाजेच्या सुमारास परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सचिन भाबड यांच्या पथकास गुप्त माहिती मिळाल्यानंतर कर्जत शिवारातील अण्णाभाऊ साठे चौक येथे सापळा रचण्यात आला. सुमारे ६.४५ वाजता राशीनकडून येणारी दोन पांढऱ्या रंगाची […]

Continue Reading

नांदगावचे उपसरपंच विजय शिंदे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे ग्रामीण साहित्य संमेलन (दुसरे) या भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमात नांदगावचे उपसरपंच तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विजय शिंदे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, तानाजी दाडर, कवी नितीन चंदनशिवे आणि प्रसिद्ध कवयित्री शर्मिला गोसावी यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार प्रदान […]

Continue Reading

बागल सर्विसेसचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर ; ६ ॲडव्हायझर्सची रशिया व इंडोनेशिया ट्रिपसाठी निवड

बागल सर्विसेस टीमने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवत JFM कालावधीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कालावधीत टीममधील तब्बल ६ ॲडव्हायझर्सनी आंतरराष्ट्रीय रशिया व इंडोनेशिया ट्रिपसाठी क्वालिफाय होण्याचा मान मिळवला आहे. या यशस्वी ॲडव्हायझर्समध्ये निलेश सुपेकर, ज्ञानेश्वर बागल, सागर डाळिंबे, संकेत आजबे, संतोष देशमुख आणि हर्षदा तोरडमल यांचा समावेश आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर […]

Continue Reading

बागल सर्विसेस टीमची दमदार झेप; २८ सदस्य इंटरनॅशनलसाठी पात्र

बागल सर्विसेस टीमने २०२५–२०२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत २८ सदस्यांना आंतरराष्ट्रीय ट्रिपसाठी पात्र ठरवून मोठे यश मिळवले आहे. या यशस्वी सदस्यांना दुबई, मलेशिया, बुडापेस्ट (हंगेरी), रशिया, डेन्मार्क आणि इंडोनेशिया या देशांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. टीमच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि मजबूत टीमवर्क हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. तसेच बागल सर्विसेसचे […]

Continue Reading

आ. रोहित पवार ‘गायब’ असल्याच्या टीकेवर ‘राष्ट्रवादी’चे प्रत्युत्तर

कर्जत- जामखेड मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आरोप- प्रत्यारोपांचा जोरदार फड रंगला आहे. भाजपचे सुनील यादव यांनी आमदार रोहित पवार मतदारसंघातून चार महिन्यांपासून गायब असल्याची टीका करत राजकीय वातावरण तापवले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथील पदाधिकारी भूषण ढेरे यांनी यादव यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सुनील यादव यांनी आमदार रोहित पवार हे […]

Continue Reading

कर्जत तालुक्यात वाढतेय शिवसेनेची ताकद ; युवकांचा पक्षप्रवेश

कर्जत तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत असून नुकत्याच पार पडलेल्या एका प्रवेश सोहळ्यात अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तालुका शिवसेना प्रमुख नितीन तोरडमल तसेच कुळधरण गटाचे शिवसेना प्रमुख किरण घालमे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात सागर घालमे, अजय घालमे, अभिजित घालमे, सोमनाथ घालमे, राजेंद्र घालमे, कृष्णा घालमे, सौरभ […]

Continue Reading

थेरवडी तलावासाठी पाणी सोडण्याची मागणी; आत्मदहन आंदोलनाचा इशारा

कर्जत तालुक्यातील राशिन, तोरकडवाडी, थेरवडी, सोनाळवाडी व पिंपळवाडी परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर थेरवडी तलावात कुकडी आवर्तनातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.भाजपा तालुका उपाध्यक्ष पप्पूशेठ धोदाड यांनी तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी, कर्जत यांना निवेदन देत प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर तत्काळ कार्यवाही […]

Continue Reading

मराठा समाजातील स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित स्थान मिळाले नाही

कर्जत–जामखेड मतदारसंघातील मराठा समाजात गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेतृत्वाच्या प्रश्नावर अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त होत आहे. गावपातळीवर भांडणे, जातीपातीचे राजकारण आणि स्वतःच्या आडनावाला मोठेपणा देण्याची स्पर्धा वाढल्याने समाजाची एकजूट कमकुवत झाल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर स्वतःला बादशहा म्हणवून घेण्याची प्रवृत्ती वाढली असली तरी समाजाचे एकत्रित नेतृत्व मात्र कमी होत […]

Continue Reading

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शिंदे येथील विजेचा प्रश्न मार्गी

कर्जत तालुक्यातील शिंदे येथे वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन तोरडमल आणि कुळधरण गटाचे शिवसेना प्रमुख किरण घालमे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून अवघ्या दोन दिवसांत वाफा डीपी बसविण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे परिसरात काही दिवसांपासून वीज पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः शेतीसाठी आवश्यक […]

Continue Reading

मार्चपूर्वी हेल्थ इन्शुरन्स घ्या ; प्रीमियम २० ते २५ टक्के वाढण्याची शक्यता : महेंद्र बागल

आरोग्य सेवांच्या वाढत्या खर्चामुळे येत्या काळात हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बागल सर्विसेसचे महेंद्र बागल यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मार्च महिना संपण्यापूर्वी आपल्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आरोग्य सेवांचा खर्च सातत्याने वाढत असल्याने विमा कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढत आहे. तसेच हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटीमध्ये […]

Continue Reading