आ. रोहित पवार ‘गायब’ असल्याच्या टीकेवर ‘राष्ट्रवादी’चे प्रत्युत्तर

कर्जत- जामखेड मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आरोप- प्रत्यारोपांचा जोरदार फड रंगला आहे. भाजपचे सुनील यादव यांनी आमदार रोहित पवार मतदारसंघातून चार महिन्यांपासून गायब असल्याची टीका करत राजकीय वातावरण तापवले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथील पदाधिकारी भूषण ढेरे यांनी यादव यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सुनील यादव यांनी आमदार रोहित पवार हे […]

Continue Reading

कर्जत तालुक्यात वाढतेय शिवसेनेची ताकद ; युवकांचा पक्षप्रवेश

कर्जत तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत असून नुकत्याच पार पडलेल्या एका प्रवेश सोहळ्यात अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तालुका शिवसेना प्रमुख नितीन तोरडमल तसेच कुळधरण गटाचे शिवसेना प्रमुख किरण घालमे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात सागर घालमे, अजय घालमे, अभिजित घालमे, सोमनाथ घालमे, राजेंद्र घालमे, कृष्णा घालमे, सौरभ […]

Continue Reading

थेरवडी तलावासाठी पाणी सोडण्याची मागणी; आत्मदहन आंदोलनाचा इशारा

कर्जत तालुक्यातील राशिन, तोरकडवाडी, थेरवडी, सोनाळवाडी व पिंपळवाडी परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर थेरवडी तलावात कुकडी आवर्तनातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.भाजपा तालुका उपाध्यक्ष पप्पूशेठ धोदाड यांनी तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी, कर्जत यांना निवेदन देत प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर तत्काळ कार्यवाही […]

Continue Reading

मराठा समाजातील स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित स्थान मिळाले नाही

कर्जत–जामखेड मतदारसंघातील मराठा समाजात गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेतृत्वाच्या प्रश्नावर अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त होत आहे. गावपातळीवर भांडणे, जातीपातीचे राजकारण आणि स्वतःच्या आडनावाला मोठेपणा देण्याची स्पर्धा वाढल्याने समाजाची एकजूट कमकुवत झाल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर स्वतःला बादशहा म्हणवून घेण्याची प्रवृत्ती वाढली असली तरी समाजाचे एकत्रित नेतृत्व मात्र कमी होत […]

Continue Reading

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शिंदे येथील विजेचा प्रश्न मार्गी

कर्जत तालुक्यातील शिंदे येथे वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन तोरडमल आणि कुळधरण गटाचे शिवसेना प्रमुख किरण घालमे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून अवघ्या दोन दिवसांत वाफा डीपी बसविण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे परिसरात काही दिवसांपासून वीज पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः शेतीसाठी आवश्यक […]

Continue Reading

मार्चपूर्वी हेल्थ इन्शुरन्स घ्या ; प्रीमियम २० ते २५ टक्के वाढण्याची शक्यता : महेंद्र बागल

आरोग्य सेवांच्या वाढत्या खर्चामुळे येत्या काळात हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बागल सर्विसेसचे महेंद्र बागल यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मार्च महिना संपण्यापूर्वी आपल्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आरोग्य सेवांचा खर्च सातत्याने वाढत असल्याने विमा कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढत आहे. तसेच हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटीमध्ये […]

Continue Reading

मिरजगावमध्ये नायटा व गजकर्ण मुक्त अभियानाचे आयोजन

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील डॉ. संतोष संभाजी बोरुडे यांच्या ओम हॉस्पिटल येथे नायटा व गजकर्ण मुक्त अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान बुधवार दि. ४ मार्च ते ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहे. या शिबिरामध्ये नायटा, गजकर्ण, तोंड येणे तसेच विविध त्वचारोगांवर अत्यंत अल्प दरात उपचार उपलब्ध […]

Continue Reading

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून कुळधरण गटातील शाळा होत आहेत डिजिटल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिकर पद्धतीने शिक्षण घेता यावे तसेच शहरी भागातील शिक्षण पध्दती ग्रामीण भागात यावी याच उद्देशाने व सभापती प्रा. राम शिंदे यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाण असल्याने यापूर्वीच कर्जत तालुक्यातील अनेक शाळांमध्ये डिजीटल पॅनल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान कुळधरण भागातील अनेक शाळांमध्ये डिजीटल पॅनल मिळाले नव्हते ही बाब वेळोवेळी लक्षात आणून […]

Continue Reading

सरपंच ते विधान परिषदेचे सभापती : संघर्ष, निष्ठा आणि जनसेवेचा प्रेरणादायी प्रवास

सरपंच ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती असा उंच भरारी घेणारा प्रवास म्हणजेच नामदार रामजी शिंदे साहेब. कोणताही राजकीय वारसा नसताना चोंडीसारख्या छोट्या गावात जन्म घेतलेल्या एका सामान्य सालकऱ्याच्या पोटी जन्मलेले रामजी शिंदे साहेब आज महाराष्ट्राच्या उच्च सभागृहाचे सभापती म्हणून राज्याच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवत आहेत. हा प्रवास म्हणजे संघर्ष, जिद्द, निष्ठा आणि समाजसेवेचे जिवंत […]

Continue Reading

कर्जत- जामखेडमधील तुतारी मोकळी करणार : सुनील यादव

भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित सदस्य सुनील यादव यांनी रोहित पवार यांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. यादव यांनी म्हटले आहे, पाच – सहा वर्षांपूर्वी निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे रोहित पवार यांच्यासोबत होते. परंतु एका खोट्या प्रकरणात या दोघांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले गेले. हे दोघे सभापती राम शिंदे यांच्या संपर्कात गेल्यानंतर […]

Continue Reading