डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दुरगावमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भीम जयंती उत्सव समिती, दुरगाव यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ७९ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरात […]

Continue Reading

भाजपाच्या कर्जत मंडळ अध्यक्षपदी अनिल गदादे

निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते अनिल गदादे यांची भाजपाच्या कर्जत तालुका मंडळ अध्यक्षपदी निवड झाली आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना, त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. २०१५ मध्ये भाजपचे १३ नगरसेवक निवडून आले होते, त्यातील अनेकांनी आमदार प्रा. राम शिंदे यांची साथ सोडली. मात्र, अनिल गदादे व […]

Continue Reading

वडगाव तनपुरा येथील तरुणावर सात जणांकडून जीवघेणा हल्ला

दूध घालण्यासाठी गेलेल्या तरुणावर सात जणांनी जोरदार हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे घडली. या प्रकरणी शुभम तनपुरे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, वडगाव तनपुरा येथील शुभम विश्वासराव तनपुरे यांचे गावाच्या शिवारातील गट क्रमांक ३६५ (१)(अ) मध्ये अडीच एकर जमीन आहे. […]

Continue Reading

कोकणगावमध्ये श्री भैरवनाथ यात्रा उत्सव ; कावड मिरवणुक ते ऑर्केस्ट्रा

कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त मंगळवार, दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता डीजे वाजवून कावड मिरवणूक होणार आहे. सकाळी १० वाजता सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता शेरणी वाटप होईल. रात्री ९ वाजता डीजे वाजवून छबिना मिरवणूक फटाक्यांच्या आतषबाजीसह पार पडणार आहे. बुधवार, दिनांक २३ […]

Continue Reading

माणुसकी जपणारा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ : सभापती प्रा. राम शिंदे

सभापती प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक बहिरोबावाडी येथील बंटी यादव यांना शुक्रवारी कॉल आला आणि ‘मी आपल्याकडे येतोय’ असे सांगितले अन् प्रा. शिंदे यांनी रात्री यादव यांची फार्महाऊसवर भेट घेतली. सभापती शिंदे यांनी यादव मित्रपरिवारासमवेत त्यांनी स्नेह जपला. नेत्याने अचानक भेट दिल्याने कार्यकर्त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. यादव परिवार आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रा. राम […]

Continue Reading

कर्जतमधील पिंक पेटल्स क्युरिअस किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक मंथन परीक्षेमध्ये कर्जत – वालवड रोडनजीकच्या स्वामी समर्थ मंदिरामागील पिंक पेटल्स क्युरिअस किड्स या प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेचे नाव उज्वल केले आहे. यामध्ये इयत्ता दुसरीतील सुयोग हुमे याने मंथन परीक्षेत केंद्रात प्रथम, राज्यात पंधरावा तर […]

Continue Reading

संस्कृती टिकवण्यासाठी ‘माता’ ; जीवसृष्टी वाचवण्यासाठी ‘माती’ अत्यावश्यक

माता आणि माती पुन्हा मिळणार नाहीत. त्यामुळे पुढच्या पिढीने आपली संस्कृती जपली पाहिजे. संस्कृती टिकवण्यासाठी ‘माता’ आणि जीवसृष्टी वाचवण्यासाठी ‘माती’ अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी केले. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे साई बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘स्वाभिमानी माऊली पुरस्कार वितरण व कीर्तन सोहळा’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात कार्य […]

Continue Reading

कर्जत नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव ; सोमवारची प्रतीक्षा !

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांच्याविरोधात नव्या अध्यादेशाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावामुळे जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी कर्जतचे प्रांताधिकारी पाटील यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच नगराध्यक्षा अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी कर्जत नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर्वी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चौकशी […]

Continue Reading

रेहेकुरी शाळेचे विद्यार्थी मंथन व लक्षवेध परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत

दरवर्षी घेण्यात येणाऱ्या मंथन व लक्षवेध परीक्षांमध्ये रेहेकुरी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. शाळेतील दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, तर दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. यामध्ये इयत्ता पाचवीतील समृद्धी महेश मांडगे हिने मंथन परीक्षेत राज्यात तिसरा, तर लक्षवेध परीक्षेत अकरावा क्रमांक मिळवला […]

Continue Reading

‘गौरी शुगर’ने ऊस बिल थकवले ; कर्जत तालुक्यातील शेतकरी …

ओंकार शुगर ग्रुपच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याने चालू ऊस गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे दोन महिन्यांपासून ऊस बिल थकवले आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून या कारखान्याने उसाचे बिल थकवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे तातडीने मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित लढा देण्याची भूमिका घेतली आहे. युवक […]

Continue Reading