भैरवनाथांच्या कुशीतलं बालपण : बहिरोबावाडी यात्रोत्सव विशेष

माझ्या आयुष्यात एका गावाने खोलवर ठसा उमटवला, तो म्हणजे कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी – मामाचं गाव. बालपण इथेच घालवलं. या मातीने मला जगण्याचं बळ दिलं, आणि एकत्रितपणे संकटांचा सामना कसा करायचा, हे शिकवलं. गावकऱ्यांची एकी, नेतृत्वगुण, आणि समाजकारणातलं सक्रिय योगदान मला अजूनही भारावून टाकतं. गावातली चैत्र पौर्णिमेची यात्रा म्हणजे आमच्यासाठी उत्सवांची पर्वणी. श्री भैरवनाथ हे गावाचं […]

Continue Reading

चॉईस हायड्रोलिक्स या फर्मचे शुक्रवारी राशीनमध्ये उद्घाटन

कर्जत तालुक्यातील राशीन येथे सुरेश कानडे यांच्या चॉईस हायड्रोलिक्स या फर्मचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. नागेश्वर पार्क, नागेश्वर मंदिराजवळ, राशीन – कर्जत रोड, राशीन येथे ही फर्म सुरु होत आहे. चॉईस हायड्रोलिक्स या फर्ममध्ये सीओटू वेल्डिंग, बकेट हार्डीग, बुम स्टिक क्रॅक रिपेरिंग, ब्रेकर, मशीन स्विंग […]

Continue Reading

भाजपाच्या नुतन मंडल अध्यक्षपद निवड प्रक्रिया सुरु

कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या नुतन मंडल अध्यक्षपदाची प्रक्रिया कर्जत व राशीन येथे पार पडली. नवीन नियमानुसार पक्षामध्ये अध्यक्ष पदासाठी दोन मंडलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये कर्जत मंडल व राशीन मंडल असे विभाजन करण्यात आले आहे. या नवीन पदाधिकारी निवडीसाठी कर्जत- जामखेड मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक उपस्थित होते. तर कर्जत मंडलाचे […]

Continue Reading

आ. रोहित पवारांच्या नगरसेवकांवरील अविश्वासामुळे नगराध्यक्षांवर अविश्वास !

कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्पष्ट बहुमताची सत्ता असून पक्षाचे १७ पैकी १२ नगरसेवक आहेत. निवडणुकीत काँग्रेसचे ३ नगरसेवकही राष्ट्रवादीच्या सोबत राहिले आणि सत्तेत सहभागी झाले. या सत्तासंरचनेचा मुख्य आधार आ. रोहित पवार यांचे नेतृत्व आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांतील घडामोडींमुळे त्यांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अडीच वर्षांचा करार आणि सुरू […]

Continue Reading

राशीन – व्यवहार शिकवणारे विद्यापीठ

राशीनमध्ये प्रवेश करताच एक वेगळे विश्व समोर येते. कर्जत तालुक्यात वसलेले हे गाव पुस्तकी शिक्षणापेक्षा वेगळे काहीतरी शिकवते – ते म्हणजे व्यवहाराचे खरे शिक्षण. या राशीन विद्यापीठात दैनंदिन जीवनातूनच माणूस व्यवहारिक शहाणपण आत्मसात करतो. मात्र हे शहाणपण बहुतांशी स्वतःपुरते मर्यादित राहते. राशीन हे केवळ घरे आणि रस्त्यांचे गाव नाही, तर एका विशिष्ट जीवनशैलीचे प्रतिबिंब आहे, […]

Continue Reading

माणसं ओळखण्याची कला !

दररोज आपण अनेक माणसांना भेटतो. काही हसतात, काही मदत करतात, काही फसवतात. सर्वांच्या चेहऱ्यावर असलेले भाव, बोलण्यातला गोडवा, वागणुकीमागचे हेतू हे खरे असतातच असे नाही. कुणी आपलं होऊन आपल्या भावनांशी खेळतं, तर कुणी शांतपणे आपल्यासाठी खंबीरपणे उभं राहतं. खरं तर, माणूस ओळखणं ही एक कठीण पण अत्यावश्यक कला आहे. ही कला शिकली नाही, तर आयुष्यात […]

Continue Reading

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत प्रवास अभियानाचा कर्जतमध्ये शुभारंभ

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त भास्कर भैलुमे मित्र मंडळ, कर्जत तालुका आणि मोटार मालक-चालक संघटना, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण कर्जत शहर तसेच कर्जत- राशीन- कर्जत या मार्गावर अंध, अपंग, कर्णबधिर आणि वयोवृद्धांसाठी १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत मोफत प्रवास अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कर्जत […]

Continue Reading

पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ठिय्या

कर्जत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी कर्जत नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी काल (दि. २) नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. ऐन उन्हाळ्यात कर्जत शहर व उपनगरांतील नागरिकांना वेळेत आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी भाऊसाहेब तोरडमल यांनी तीन महिन्यांपासून कर्जत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित केला होता. आगामी […]

Continue Reading

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन ; प्रशासनाकडून लेखी आश्वासन

कर्जत नगरपंचायतीत कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी नगरसेवक भास्कर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कर्जत ग्रामपंचायत कार्यकाळापासून स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या लिलाबाई कांबळे, कमल भिसे, विमल आखाडे, भामाबाई भैलुमे तसेच पूर्वी कार्यरत असलेल्या पार्वती कदम, सुशिला ओव्हळ आणि विमल लोढे यांनी आयुष्यभर तुटपुंज्या वेतनावर सेवा केली. त्यांच्या वारसांना सेवेत […]

Continue Reading

इंडियन बँकेच्या सी.एस.ए. पदी कोरेगावचे विठ्ठल अडसूळ

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील दादासाहेब माणिक अडसूळ यांचे चिरंजीव विठ्ठल दादासाहेब अडसूळ यांची आयबीपीएस २०२४ मार्फत घेण्यात आलेल्या इंडियन बँक सी. एस.ए. पदी निवड झाली आहे. विठ्ठल अडसूळ दहावीमध्ये शिकत असताना त्यांना प्रमोद भैलुमे सरांचे मार्गदर्शन लाभले. बँकिंग परीक्षेचा अभ्यास २०२२ ते २०२५ या कालावधीमध्ये केला असून त्यात ६२ पूर्व परीक्षा, १७ मुख्य परीक्षा आणि […]

Continue Reading