कोरेगावच्या जैनब शेखचा राज्यात प्रथम क्रमांक

सांगली येथे सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता २ रीतील विद्यार्थिनी जैनब फतेहमोहम्मद शेख हिने आपल्या उल्लेखनीय यशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत […]

Continue Reading

अजातशत्रू, सचोटीला जीवनमूल्य मानणारे व्यक्तिमत्त्व डॉ. सागरकुमार ढोबे पाटील

साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम डॉ. सागरकुमार ढोबे पाटील यांच्या स्वभावात दिसून येतो. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी यशाचा सुवर्णकळस गाठला. आज व्यवसायात त्यांना लाभलेले यश हे केवळ नशिबाचे देणं नसून अथक परिश्रम, खडतर प्रवास आणि भक्कम साधनेचा पाया यांची फलश्रुती आहे. विश्वास हा शब्द जिथे अपुरा पडतो […]

Continue Reading

टपऱ्या काढण्याच्या नोटीसीविरोधात दिव्यांग व्यक्ती व विधवा महिलेचे उपोषण

कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या जागेवरील टपऱ्या काढण्याच्या नोटीसीविरोधात दिव्यांग व्यक्ती व विधवा महिलेने उपोषण सुरू केले आहे. पाटेवाडी येथील दिव्यांग व्यक्ती बारकू किसन खरात तसेच विधवा महिला मंगल श्रीधर पोकळे यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी ग्रामपंचायतीच्या जागेत टपऱ्या उभारल्या आहेत. ग्रामसभेच्या ठरावाद्वारे या टपऱ्या कायम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले. तरी गणेश देशमुख, वैशाली सुरवसे, […]

Continue Reading

बागल सर्विसेसकडून युवकांना ‘हेल्थ इन्शुरन्स’ व्यवसायात उतरण्याचे आवाहन

ग्रामीण भागातील युवकांनी रोजगार आणि समाजसेवा या दुहेरी उद्देशाने हेल्थ इन्शुरन्स सारख्या विश्वासार्ह व्यवसायात उतरावे असे आवाहन बागल सर्विसेसकडून करण्यात आले आहे. यावेळी बोलताना केअर हेल्थ इन्शुरन्सचे एसएसओ महेंद्र बागल यांनी सांगितले की, हेल्थ इन्शुरन्स हा फक्त व्यवसाय नसून तो समाजसेवेचा मार्ग आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, गोरगरीब मजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांना अडचणीच्या वेळी आर्थिक आधार […]

Continue Reading

सोनाळवाडीचे सरपंच बाळासाहेब काळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

कर्जत तालुक्यातील सोनाळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बाळासाहेब गणपत काळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या माध्यमातून ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन शनिवार दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे करण्यात आले होते. कर्जत तालुक्यातून या कार्यक्रमाकरिता बाळासाहेब गणपत काळे यांची निवड संस्थेने केली होती. संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या […]

Continue Reading

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून टाकळी खंडेश्वरी शाळेस इंटरॅक्टिव्ह पॅनल

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी ६५ इंची आधुनिक इंटरॅक्टिव्ह पॅनल उपलब्ध करून देण्यात आला आहे. या डिजिटल साधनामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. व्हिडिओ, चित्रफीत, सादरीकरणे आणि विविध शैक्षणिक ॲप्सच्या माध्यमातून […]

Continue Reading

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून कुळधरण गटातील शाळा होत आहेत डिजिटल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिकर पद्धतीने शिक्षण घेता यावे तसेच शहरी भागातील शिक्षण पध्दती ग्रामीण भागात यावी याच उद्देशाने व सभापती प्रा. राम शिंदे यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाण असल्याने यापूर्वीच कर्जत तालुक्यातील अनेक शाळांमध्ये डिजीटल पॅनल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान कुळधरण भागातील अनेक शाळांमध्ये डिजीटल पॅनल मिळाले नव्हते ही बाब वेळोवेळी लक्षात आणून […]

Continue Reading

तिरुपती पत्रा कंपनीचा आज पहिला वर्धापन दिन

कर्जत तालुक्यातील राशीन रोड, लकी हॉटेलजवळ, कर्जत येथे दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू केलेल्या तिरुपती पत्रा कंपनी या नवीन व्यवसायाला दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आपल्या स्थापनेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करत दुसऱ्या वर्षात दमदार पदार्पण केले आहे. अल्पावधीतच गुणवत्ता, विश्वासार्हता आणि ग्राहकसेवेमुळे कंपनीने बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिरुपती कंपनीचे […]

Continue Reading

कर्जतमध्ये तमाशा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

तमाशा सारखी पारंपारिक लोककला जपणं आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तमाशा प्रशिक्षण शिबिर घेणे ही काळाची गरज आहे, कारण अशा प्रशिक्षण शिबिरातूनच नवीन कलावंत घडतील असे प्रतिपादन कर्जतच्या नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कर्जत […]

Continue Reading

कवडगाव – गिरवली ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची पोलखोल

जामखेड तालुक्यातील कवडगाव–गिरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये मागील पाच वर्षांतील कथित भ्रष्टाचाराची मोठी पोलखोल झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कवडगावचे तत्कालीन ग्रामसेवक फरतडे भाऊसाहेब तसेच सध्याचे ग्रामसेवक रोमाडे यांच्यावर या कथित भ्रष्टाचाराची जबाबदारी असल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार विविध विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झालेला असून त्याची सविस्तर यादी ग्रामसभेत वाचून […]

Continue Reading