दादा पाटील महाविद्यालयात गुणवंत कलाकारांचा सन्मान

कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या गुणवंत कलाकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. काळाआड चाललेल्या महाराष्ट्राच्या लोक संस्कृतीला उजाळा देण्यासाठी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘शिवजन्म ते शिवराज्याभिषेक’ या नाट्य महाप्रयोगातील कलाकारांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी उपप्राचार्य व […]

Continue Reading

कर्जतचा आर्यवीर कदम राज्यात दुसरा

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत कर्जत तालुक्यातील धांडेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दुसरीत शिकणारा विद्यार्थी आर्यवीर राजेंद्र कदम याने १५० पैकी १४८ गुण घेऊन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते हा उत्कृष्ट संदेश आहे. आर्यवीरने संपादन केल्या यशामुळे कर्जत तालुक्याचे […]

Continue Reading

श्री क्षेत्र निंबे येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ

आकर्षक फुले, विद्युत रोषणाई, रांगोळ्यांची सजावट अशा मंगलमय वातावरणात निंबे येथील ग्रामदैवत संत लिंबाजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. संत लिंबाजी महाराजांच्या दर्शनासाठी विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने असतात.कीर्तन सेवेसाठी भव्य असा मंडप उभारला असून महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची कीर्तनसेवा होणार आहे. सकाळपासूनच विविध भागातून भाविकांची निंबेकडे रेलचेल सुरु होती. गावातील संत हनुमान […]

Continue Reading

पै. रोहित मोढळे ठरला कर्जत केसरीचा मानकरी

  कै. भास्करदादा गुलाबराव तोरडमल व कै. दिलीपनाना गुलाबराव तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिमित्त विजय तोरडमल यांचे माध्यमातून शनिवारी कर्जत येथे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले. या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्र तसेच हरियाणा राज्यातील नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला. सर्व सामाजिक संघटना यांच्या हस्ते कुस्ती मैदानाचे उद्घाटन होऊन लहान मोठ्या कुस्त्यांना सुरुवात झाली.  महाराष्ट्रातील दहा ते बारा महाराष्ट्र […]

Continue Reading

अजितदादा, एकत्रित फोटो बघून तुम्हाला …

मा. अजितदादा, पवार कुटुंबातल्या सदस्यांचा आदरणीय पवार साहेबांसोबतचा एकत्रित फोटो बघून तुम्हाला दुःख होणं स्वाभाविक आहे. यातूनच अमेरिकेच्या वर्तमानपत्रात बातमी येण्यासाठी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप तुम्ही केलात. उलट या फोटोत तुम्हीही असता तर सगळ्यांनाच आनंद झाला असता, परंतु जे केवळ तुमचा वापर करतायेत त्यांना हे नको होतं, असं आमचं ठाम मत आहे. आणि ज्यांनी […]

Continue Reading

शनिवारी कर्जतमध्ये भव्य कुस्त्यांचे मैदान

कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील कै. भास्करदादा तोरडमल आणि कै. दिलीपनाना तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रीडा संकुलाचे प्रमुख, राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष बहिरोबावाडीचे माजी सरपंच विजयकुमार तोरडमल यांनी दिली. २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपासून कर्जतमधील कै. भास्करदादा तोरडमल व कै. दिलीपनाना तोरडमल क्रीडा संकुल येथे […]

Continue Reading

फुले व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ‘ग्रंथप्रदर्शन व १४ तास अखंड वाचन उपक्रम

दादा पाटील महाविद्यालयामध्ये‘दि.१० एप्रिल ते १४ एप्रिल २०२३’ या कालावधीत महात्मा जोतीराव फुले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय, मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने महाविद्यालयात ‘ग्रंथप्रदर्शन व १४ तास सलग अखंड […]

Continue Reading

कर्जतमध्ये सामाजिक संदेशातून महामानवास अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कर्जत शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. कर्जत शहराच्या प्रमुख चौक छञपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी व रस्त्यावर उभारण्यात आलेल्या विविध संदेशातुन सर्वाचे लक्ष वेधले. भीम ध्वज, सुरेल आवाजात सुरू असलेले भीम गीत छञपती शिवाजी महाराज चौकात केलेली विद्युत रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. डॉ. […]

Continue Reading

राशीनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

कर्जत तालुक्यातील राशीन येथील संत रोहिदास नगर येथे डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी सात वाजेपासून रोहिदास नगरमधील भीमसैनिकांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. प्रतिमापूजन कार्यक्रमासाठी श्याम कानगुडे, भीमराव साळवे, रामकिसन साळवे, अतुल साळवे ,सचिन साळवे, दीपक […]

Continue Reading

‘सदगुरू’चा विद्यार्थी कृषी क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेतृत्व करेल : डॉ. शंकरराव नेवसे

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना विद्ये विना मती गेली, या उक्तीप्रमाणे शिक्षणाचे असाधारण महत्त्व अधोरेखित केले आहे. या प्रसंगी विद्यार्थ्यांना नेहमी आईवडिलांच्या कष्टाची जाण असावी व गुरुंप्रति कृतज्ञता असणे हे गुणधर्म एक चारित्र्यवान व्यक्तिमत्व घडविण्यास मदत करते, असे प्रतिपादन डॉ. शंकरराव नेवसे यांनी केले. दि. ५ एप्रिल २०२४ रोजी श्री संत गजानन […]

Continue Reading