कर्जत शहरातील अनाधिकृत होर्डींग हटवा ; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची मागणी

मुंबई घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेची पुनरावृत्ती कर्जत शहरात होवू नये यासाठी कर्जत शहरातील अनाधिकृत होर्डींग हटविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत शहर युवक उपाध्यक्ष सुमित रमेश भैलुमे यांनी केली आहे. कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदन देवून त्यांनी ही मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागात होर्डीग कोसळून दुर्देवी घटना […]

Continue Reading

विखेंच्या चेल्याचपाट्यांना
सामान्य जनतेचा ‘राजकीय पदर’ तपासण्याची खोड

आपल्याकडे लग्न ठरवताना ‘पदर’ जुळतो का ? हे पाहिले जाते. यामध्ये केवळ जातच नव्हे तर पोटजातसुद्धा जुळणे गरजेचे मानले जाते. हे अगदी जुळले की पुढील बोलाचाली करुन निर्णय घेतला जातो. काहीशा तशाच कार्यपद्धतीचा विखे यांच्या जवळच्या नेत्यांकडून अवलंब केला जात आहे. खा. डॉ. सुजय विखे हे मतदारसंघाकडे फिरकत नसल्यामुळे लोक आपली कामे घेऊन विखे यांच्या […]

Continue Reading

आमिषे दाखवून मतदारांना भुलवायचे आणि निवडणूक जिंकायची ! हाच का ‘विखे पॅटर्न’ ?

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर कर्जत तालुक्यातील मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. निवडून आल्यानंतर साडेचार वर्षात ते अपवादानेच मतदारसंघात दिसले. निवडणुकीपूर्वी सामाजिकतेचा बुरखा घेत वेगवेगळे फंडे वापरत जनतेला तात्पुरता दिलासा देण्याचे काम त्यांच्या यंत्रणेने केले. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही महिन्यातच जनसेवेच्या या योजना बंद करण्यात आल्या. […]

Continue Reading

कुळधरण : भरत खराडे याच्याविरुद्ध ३ लाखांच्या मुरुम चोरीचा गुन्हा दाखल

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील भरत बापू खराडे याच्याविरुद्ध ३ लाख रुपये किंमतीचा मुरुम व माती चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुळधरण येथील गट नंबर ९१३/ ३ मधील मुरुम व माती जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलून नेल्याप्रकरणी शेतजमीन मालक रामचंद्र जगताप यांनी कलम ३७९ अन्वये कर्जत पोलिसात हा गुन्हा दाखल केला आहे. जगताप यांनी फिर्यादीत […]

Continue Reading

विस्ताराधिकारी गायकवाड व ‘कोटा मेंटॉर्स’च्या कामकाजाची त्री सदस्यीय समितीकडून चौकशी

कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड व कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स शाळेच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी दिले आहेत. पालक किरण जगताप यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेवून ही चौकशी समिती नेमण्यात आली आहे. भाग : ७ याबाबतची अधिक माहिती अशी, कर्जत कोटा मेंटॉर्स शाळेमध्ये दुसरीत शिकत असलेल्या संस्कार जगताप या […]

Continue Reading

‘कोटा’ शाळेत पावत्या न देताच फी वसुली ; विस्ताराधिकाऱ्यांची चौकशीत टाळाटाळ

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स शाळेतून पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात आहे. मान्यता देताना शासनाने घालून दिलेल्या अनेक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार पालक किरण जगताप यांनी कर्जतच्या शिक्षण विभागाकडे केली होती. त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड यांनी चौकशीतील अनेक मुद्दे टाळले असल्याने जगताप यांनी पुन्हा चौकशीत वगळलेल्या मुद्द्यांवर […]

Continue Reading

नेत्याच्या हस्तक्षेपामुळे उत्खनन पंचनाम्यास टाळाटाळ ; तहसीलदारांविरुद्ध तक्रार

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील रामचंद्र जगताप यांच्या गट नंबर ९१३/३ मध्ये सुमारे १००० ब्रास उत्खनन करण्यात आलेले आहे. कर्जत महसूल विभागाकडे तक्रार केली, मात्र महसूल विभागाच्या विविध नियमांचे उल्लंघन करून तहसीलदार यांनी वेळोवेळी उत्खननाचा पंचनामा व वाहनांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केलेली आहे. योग्य कारण, खुलासा न देता तसेच नियमबाह्य पद्धतीने अर्ज निकाली काढून मला न्यायापासून […]

Continue Reading

‘कोटा मेंटॉर्स’ची चौकशी करणाऱ्या विस्ताराधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

संस्कार जगताप या विद्यार्थ्याचा कोटा मेंटॉर्स शाळेमध्ये दुसऱ्या इयत्तेत आरटीईमधून प्रवेश होऊनही १३००० रुपयांच्या फीची सक्तीने मागणी केल्याने पालक किरण जगताप यांनी २६ ऑगस्ट २०२३ रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. ७ विविध मुद्द्यांच्या आधारे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार २९ […]

Continue Reading

कोटा मेंटॉर्स स्कूलच्या तक्रारीबाबत कर्जतच्या शिक्षण विभागास स्मरणपत्र

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलच्या गैरकारभाराबाबत पालक किरण जगताप यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे २८ ऑगस्ट २०२३ रोजी लेखी तक्रार अर्ज केलेला आहे. मात्र त्या अर्जाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने प्रतिसाद न दिल्याने जगताप यांनी शिक्षण विभागाला स्मरणपत्र दिले आहे. भाग : ४ पत्रात म्हटले आहे, माझा मुलगा संस्कार जगताप हा कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. […]

Continue Reading

कोणत्या मुद्द्यांवर सुरु आहे कर्जतच्या ‘कोटा मेंटॉर्स स्कूल’ची तपासणी

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये शासनाने घालून दिलेल्या विविध नियमांचे व शासन आदेशांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची लेखी तक्रार पालक किरण जगताप यांनी कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. भाग : ३ तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, माझा मुलगा संस्कार हा स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत […]

Continue Reading