पत्रकारिता क्षेत्रात विविध माध्यमातून करिअरच्या संधी : प्रा. गोडसे

पत्रकारिता क्षेत्रामध्ये विविध माध्यमातून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य या सर्वच प्रसारमाध्यमांचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेमध्ये रस आहे ते या क्षेत्रात येऊ शकतात. कोणत्याही गोष्टीची जिज्ञासा, चिकित्सक विचार, सामाजिक प्रश्न धाडसाने मांडण्याचे कौशल्य असलेले युवक या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील उपजत कौशल्ये तपासून या […]

Continue Reading

कर्जतचा सार्वजनिक बांधकाम विभाग ‘भाडखाऊ’ ?

कर्जत- खेड महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी लाखो रुपयांचा खर्च करून दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत. याचा उद्देश प्रवाशांना गावांची माहिती व अंतर सहज मिळावे हा आहे. मात्र विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या फलकांचा मूळ उद्देश हरवत चालला आहे. गेल्या दीड- दोन वर्षांपासून या फलकांवर वारंवार राजकीय जाहिराती, अभिनंदन संदेश आणि इतर व्यावसायिक फलक लावण्यात […]

Continue Reading

संतोष रणदिवे : जिद्द, मेहनत आणि निष्ठेची प्रेरणादायी कहाणी

कधी कधी माणसाच्या आयुष्यातले संघर्ष त्याला केवळ मोठेच करत नाहीत, तर इतरांसाठी एक प्रकाशझोत निर्माण करतात. भांबोरा गावातील संतोष रणदिवे यांची कहाणी अशीच आहे. एक उच्चशिक्षित युवक, ज्याने आपला मार्ग स्वतःच्या कष्टांवर आणि ध्येयावर विश्वास ठेवून तयार केला. गावाकडच्या मातीशी नाळ जुळलेली असली तरी त्यांचे स्वप्न आभाळाला गवसणी घालणारे होते. उच्चशिक्षण घेतल्यानंतर अनेकांना शहरात नोकरीच्या […]

Continue Reading

परभणीतील घटनेचा आरपीआयकडून कर्जतमध्ये निषेध

परभणी येथे झालेल्या घटनेचा कर्जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष सतीश भैलुमे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी, ( दि. १६) कर्जतचे पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन दिले. दि. १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका समाजकंटकाने महामानव […]

Continue Reading

राशीन मार्गालगत निजलाय कर्जतचा सार्वजनिक बांधकाम विभाग !

प्रवाशांना गावांच्या अंतराची माहिती होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा किलोमीटर स्टोन्स उभारले जातात. मात्र कर्जत- राशीन- खेड महामार्गालगत उभारलेले कित्येक किलोमीटर स्टोन्स व इतर स्टोन्स आडवे पडलेले दिसत आहेत. तर अनेक ठिकाणचे स्टोन्स गायब झालेले आहेत. अनेक महिन्यांपासून रस्त्यालगत हीच स्थिती पाहायला मिळत असल्याने प्रवाशांना गावांचे अंतर आणि दिशांची माहिती मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे […]

Continue Reading

पुलाजवळ रिफ्लेक्टरचा अभाव ; राशीन महामार्गावर अपघात

कर्जत तालुक्यातील राशीन – खेड महामार्गावर करमणवाडी फाटा येथे पुलाजवळ रिफ्लेक्टर बसवण्यात आले नसल्याने अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ट्रेलर पलटी होऊन हा अपघात झाला. पुलावर रिफ्लेक्टर नसल्यामुळे चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने रात्री हा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे, या पुलाला कठडेही नसल्याने कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची चूक अधोरेखित होत आहे. या महामार्गावरून […]

Continue Reading

कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘निर्लज्जम कारभार’

कर्जत- राशीन महामार्गावरील रस्त्याच्या बांधकामातील हलगर्जीपणामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महामार्गाचे विस्तारीकरण होताना त्याबरोबर सर्व पुलांचे रुंदीकरण होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराने अनेक पुलांचे रुंदीकरण केले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी जास्त आणि पुलाची रुंदी कमी अशी परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे टू व्हीलर ट्रॅकवरून जाताना रस्ता अचानक बंद होऊन तो पुलाजवळच्या खड्ड्यात घेवून […]

Continue Reading

दुःखांच्या सावल्यांमधून जिद्दीने मार्गक्रमण करणारा वर्गमित्र – संजय काकडे

कर्जत शहरातील एका सामान्य व्यक्तीची ही कहाणी. पण, साधेपणाच्या आवरणाखाली संघर्षाचे प्रचंड वादळ आहे, अश्रूंची दरी आहे, आणि तरीही या व्यक्तीने केलेली वाटचाल प्रत्येकाच्या मनाला विचार करायला लावणारी आहे. ही कथा आहे संजय मारुती काकडे यांची ! ज्यांचे आयुष्य दुःखाच्या आघातांनी भरलेले असूनही त्यांनी त्या आघातांवर मात करत उभे राहण्याचे धैर्य दाखवले आहे. १९७६ साल. […]

Continue Reading

सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळेझाक ; प्रवाशांचा जीव धोक्यात !

कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कर्जत- कुळधरण मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. बांधकाम विभागाकडून प्रवाशांच्या माहितीसाठी रस्त्याच्या दुतर्फा लावलेले अनेक माहिती फलक हे झाडेझुडपांमध्ये अडकून गेले आहेत. या फलकांवरील संदेश स्पष्टपणे वाचता येत नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मार्गदर्शन मिळत नाही. रस्त्याच्या कडेला गावांचे अंतर दर्शविणारे स्टोन्स हे गवत, वेली […]

Continue Reading

उपअभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर केसकर यांचे उपोषण मागे

आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन करणार : केसकर कर्जत तालुक्यातील तरडगाव येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली. या योजनेसाठी शासनाकडून ७७ लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली परंतु या योजनेचे काम चालू करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती ठेकेदार यांच्या साखळी पद्धतीने हे काम अगदी निकृष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. यासाठी कर्जत पंचायत […]

Continue Reading