माळी समाजाचे उपनगराध्यक्ष होऊ नये म्हणून विरोधकांचे कट कारस्थान

कर्जत नगरपंचायतीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गटनेते पदाच्या वादावर अखेर शिक्कामोर्तब झाला असून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घेतलेल्या निर्णयानुसार संतोष म्हेत्रे हेच कर्जत नगरपंचायतीचे अधिकृत गटनेते असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कर्जत – जामखेडच्या राजकारणात सभापती प्रा. राम शिंदे यांची अधिक सरशी झाली आहे. नगरसेवक अमृत काळदाते यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज […]

Continue Reading

पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवर  २ टक्के कॅशबॅक मिळवा : अक्षय राऊत

कर्जत- राशीन महामार्गालगतच्या एचपी माऊली पेट्रो स्टेशनमध्ये ९०.९४ रुपयांच्या डिझेल खरेदीवर २ रुपये कॅशबैक म्हणजेच डिझेल ८८.९४ रुपयांना पडणार व १०४.४४ रुपयांच्या पेट्रोल खरेदीवर २ रुपये कॅशबॅक म्हणजेच १०२.४४ रुपयात मिळेल. जिओपेक्षा १ रुपये कमी व नायरापेक्षा १.३३ पैसे कमी आईओसीएल आणि बीपीसीएल पेक्षा २.३० पैसे रूपयांनी बचत होणार आहे, असे माऊली पेट्रो स्टेशनचे संचालक […]

Continue Reading

आनंद तरंगे यांचे निधन

कर्जत येथील प्रसिद्ध डॉ. दिनकर तरंगे यांचे चिरंजीव आनंद, वय ५२ वर्ष यांचे अल्पशा आजाराने बडोदा येथे निधन झाले. ते बडोदा येथे राहत होते. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. आनंद दिनकर तरंगे हे जी डी आर्ट ही कला शाखेतील पदवी प्राप्त केलेले होते. त्यांनी या […]

Continue Reading

कारगिलच्या रणांगणावरून देशसेवेची शपथ आजही ताजीच ! भाऊसाहेब रानमाळ म्हणतात …

भाऊसाहेब देविदास रानमाळ. कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील वर्गमित्र. सैन्य दलात भरती झाला. देशसेवा करून सेवानिवृत्त झाला. सध्याच्या युद्ध परिस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागला. “कारगिल युद्धाच्या त्या पाच रात्र–पाच दिवसांत आम्ही एक क्षणही झोपलो नाही… थंडी, तणाव, आणि शत्रूचा दबाव असूनही मनात एकच भावना होती – भारत माता की जय !” — असं सांगताना माजी […]

Continue Reading

गरीबीचा अनुभव माणसं घडवतो !

जगायला केवळ पैसा लागतो असं नाही, जगण्यासाठी लागतो धीर, जिद्द आणि परिस्थितीशी झुंजायची ताकद. प्रतिकूल परिस्थिती ही माणसाची खरी परीक्षा असते. अनेकदा वाटतं, का आपल्याच वाट्याला हे सगळं येतंय ? पण हेच अडथळे, हेच दुःख, हेच अभाव माणसाला घडवत असतात. प्रतिकूल परिस्थितीतून माणूस शिकतो. जीवनातील अडचणी त्याला कळतात, तो स्वतःशी संवाद साधू लागतो. अनेक ठिकाणी […]

Continue Reading

हळगावच्या कृषि महाविद्यालय सभागृह इमारतीस १४३२.८९ लाखांचा निधी ; उद्या मुख्यमंत्री …

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव, ता. जामखेड येथे सभागृह (कॉन्फरन्स हॉल) इमारत उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून 1432.89 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता 5 मे, 2025 रोजी शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या यासंदर्भातील पाठपुराव्याला यश आले असून या निर्णयाचे कर्जत आणि […]

Continue Reading

दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत यश

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत दादा पाटील महाविद्यालयाने यशाची परंपरा राखली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.०६ टक्के लागला आहे. दिक्षा नानासाहेब जाधव (८९.६७%), साक्षी आजीनाथ मोहळकर (८६%), श्रावणी तानाजी निंबाळकर (८५.६७ %) या विद्यार्थिनींनी विज्ञान शाखेत गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९९.०८ टक्के लागला असून त्यातील तीन प्रथम क्रमांकाचे […]

Continue Reading

खेड विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण ; विद्यार्थ्यांना निकालपत्रांचे वितरण

कर्जत तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेतील सेवानिवृत्त सेवक विठ्ठल भिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी, रमा सप्तर्षी, मुख्याध्यापक गोरक्ष भापकर, सुरेश पवार, माजी पंचायत समिती सदस्य मारुती सायकर, ‘युक्रांद’चे कमलाकर शेटे, संस्थेतील शिक्षक व उपस्थित पालकांच्या हस्ते निकालपत्रांचे वितरण करण्यात आले. […]

Continue Reading

कर्जतमधील सत्तेचा तमाशा आणि लोकशाहीची विटंबना !

कर्जत नगरपंचायतीतील सत्तासंघर्ष हा केवळ स्थानिक राजकारणाचा भाग नसून संपूर्ण लोकशाही प्रक्रियेच्या अधोगतीचे गंभीर लक्षण असल्याचे दिसत आहे. नगरसेवकांची निष्ठा, पक्षांतरांची गुप्त व्यूहरचना आणि सत्तेसाठी चाललेली धडपड या सर्व घडामोडी जनतेच्या विश्वासाला नाकारत आहेत. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी भाजपाशी हातमिळवणी करत नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल […]

Continue Reading

कर्जत नगरपंचायतीतील सत्ताकारणाला आज आणखी वेगळे वळण

कर्जत नगरपंचायतीतील गटनेता बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता फेटाळला, परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय उच्च न्यायालयाने अमान्य केला असून नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्ताकारणाने आज आणखी वेगळे वळण घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जत नगरपंचायतीतील सत्तेची रस्सीखेच सुरु आहे. आमदार रोहित पवार यांच्या […]

Continue Reading