देशातील घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी जनजागरण अभियान : सुनील चव्हाणके

देशामध्ये दहा कोटी घुसखोर असून बांडगुळांप्रमाणे हा आपला देश खातात, यांना बाहेर काढण्याची गरज आहे, अशी टीका सुनील चव्हाणके यांनी कर्जत येथे केली आहे. घुसखोरीच्या विरोधात जनजागरण करण्यासाठी सुनील चव्हाणके यांनी शिव प्रेरणा यात्रा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काढली आहे. या यात्रेचे कर्जत येथे जोरदार स्वागत करण्यात आले. शहरामध्ये दुचाकीवरून भगवे झेंडे लावून भव्य रॅली काढण्यात आली. […]

Continue Reading

आ. रोहित पवार हे फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही तर समाजकार्यासाठी राजकारणात

आ. रोहितदादा पवार हे सरळ विचारसरणीचे नेते आहेत. त्यांच्या विचारात स्पष्टता आणि प्रामाणिकता असल्यामुळे त्यांच्यासमोर कितीही आव्हाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा मार्ग कोणी रोखू शकत नाहीत. आ. रोहितदादा यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्वितीय ताकद आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे. रोहितदादांनी कर्जत – जामखेड मतदारसंघामध्ये केलेले कार्य […]

Continue Reading

सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा कधी पूर्ण होणार ?

सर्वसामान्य जनतेची पहिली गरज आहे, ‘भाकरी’ . भाकरीच्या प्राप्तीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे सोडून त्यांच्या हातात धर्माचे जातीचे अस्मितेचे गाजर देऊन चघळीत बसायला लावणाऱ्या सर्व संधी साधू राजकारण्यांना जनतेनेच धडा शिकवायला हवा. एकमेकांच्या सत्तेची ताकद दाखवण्यासाठी सामान्य जनतेच्या गळ्यावरून आपल्या खोट्या कर्तुत्वाचे शस्त्र फिरवून स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यात मग्न असणारे आणि एकमेकांचे उणे दुणे […]

Continue Reading

कर्जत – जामखेड मतदारसंघात आ. रोहितदादा जोमात – बाळासाहेब कोऱ्हाळे

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता, पारंपारिक लढत परत एकदा कर्जत-जामखेडकरांना अनुभवायला मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आ. रोहित पवार यांनी कधीही खालच्या पातळीवरील टीका केली नाही, तसेच तालुक्याची राजकीय संस्कृती जपली आहे. मतदारसंघातील प्रलंबित आणि रखडलेल्या समस्या व अडचणी दूर करून कायापालट करण्याचे त्यांचे ध्येय आहे. पायाभूत सुविधा आणि नागरी प्रश्न मार्गी लावून, रस्ते, […]

Continue Reading

आ. रोहित पवार यांनी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कर्जत-जामखेडच्या जनतेने कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांना डावलून मोठ्या अपेक्षेने युवा नेता म्हणून रोहित पवार यांना निवडून दिले. मात्र, रोहित पवार यांनी मोठमोठी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली. युवकांच्या रोजगाराच्या आश्वासनाची पूर्तता पाच वर्षांत झाली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोहित पवार कधी विधानसभेत बोलले नाहीत, ना त्यांचे प्रश्न मार्गी लावले. २०१९ च्या निवडणुकीत […]

Continue Reading

‘लाडकी बहीण योजना’ महिलांच्या आत्मसन्मानाचा आधार की …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. या आर्थिक मदतीचा उद्देश कुटुंबातील गरजू महिलांना थेट लाभ देऊन त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक आधार देणे आहे. या योजनेचा फायदा राज्यातील लाखो गरीब महिलांना होत असून त्यांचा आर्थिक […]

Continue Reading

भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीची कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता पार्टीच्या कर्जत तालुका आध्यात्मिक आघाडीची नूतन कार्यकारिणी तालुकाध्यक्ष सुनील रामदास पोकळे यांनी मंगळवारी कर्जत येथे जाहीर केली. या आघाडीच्या उपाध्यक्षपदी आनंद मच्छिंद्र कवडे, कोळवडी, बापूराव लक्ष्मण भोंडवे, सोनाळवाडी, संजय सायकर, करमणवाडी, सुरेश शिवा खरात, जोगेश्वरवाडी तसेच बाळासाहेब सुपेकर यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी प्रकाश पवार, रुईगव्हाण, अभिजित जांभळकर, राशीन, निळकंठ काळे, शिंपोरा, […]

Continue Reading

स्वाभिमानी भूमिपुत्र विरुद्ध लाचारांची फौज अशी ही निवडणूक होणार !

आ. प्रा. राम शिंदे हे कर्जत- जामखेड मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार आहेतच. ज्या भूमीत जन्मला त्याला भूमिपुत्र म्हणतात. आ. राम शिंदे यांचा जन्म आणि जडणघडण याच मातीत झाल्यामुळे ते अस्सल भूमिपुत्रच आहेत. ते कोणासारखे उपरे म्हणून दुसऱ्या मतदारसंघात जाऊन डोकावलेले नाहीत. त्यामुळे ‘भूमिपुत्र’ हा ट्रेंड या भूमीतल्या जनतेतून आलेला आहे. त्यामुळे उपऱ्याला लोक त्याची जागा दाखवून […]

Continue Reading

कुळधरणच्या पालखी उत्सवात भाविकांची अलोट गर्दी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील श्री जगदंबा देवीच्या पालखी उत्सवात भाविकांचा महापूर लोटला होता. नवरात्रापासून वाढत चाललेला भाविकांचा ओघ पालखी उत्सवातही पहावयास मिळाला. विजयादशमीच्या रात्री फुलाचा मान देऊन बाहेर पडलेल्या पालखीच्या दर्शनासाठी विविध भागातील भाविकांनी हजेरी लावली. माहूरची रेणुकामाता व तुळजापूरची तुळजाभवानी या शक्तिपीठांचे ठाणे असलेल्या कुळधरण नगरीत श्री जगदंबा देवीचा पालखी […]

Continue Reading

आ. रोहित पवार हे कर्जत- जामखेड तालुक्याच्या विकासाची ‘पॉवर’ : बाळासाहेब कोऱ्हाळे

आ. रोहितदादा पवार हे केवळ नावापुरते नेते नाहीत, तर त्यांनी आपल्या कामातून जनतेच्या मनात एक विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत- जामखेड तालुका विकासाच्या नव्या शिखरांवर जाणार आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्णत्वास येत आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे तालुक्यातील विकासाच्या गतीला एक नवीन […]

Continue Reading