कुळधरणच्या पालखी उत्सवात भाविकांची अलोट गर्दी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील श्री जगदंबा देवीच्या पालखी उत्सवात भाविकांचा महापूर लोटला होता. नवरात्रापासून वाढत चाललेला भाविकांचा ओघ पालखी उत्सवातही पहावयास मिळाला. विजयादशमीच्या रात्री फुलाचा मान देऊन बाहेर पडलेल्या पालखीच्या दर्शनासाठी विविध भागातील भाविकांनी हजेरी लावली. माहूरची रेणुकामाता व तुळजापूरची तुळजाभवानी या शक्तिपीठांचे ठाणे असलेल्या कुळधरण नगरीत श्री जगदंबा देवीचा पालखी […]

Continue Reading

आ. रोहित पवार हे कर्जत- जामखेड तालुक्याच्या विकासाची ‘पॉवर’ : बाळासाहेब कोऱ्हाळे

आ. रोहितदादा पवार हे केवळ नावापुरते नेते नाहीत, तर त्यांनी आपल्या कामातून जनतेच्या मनात एक विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत- जामखेड तालुका विकासाच्या नव्या शिखरांवर जाणार आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्णत्वास येत आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे तालुक्यातील विकासाच्या गतीला एक नवीन […]

Continue Reading

शंभू मिलची प्रभावी उत्पादने

कर्जतकरांच्या आरोग्यासाठी कर्जत येथील शंभू मिलचे सर्वच उत्पादने प्रभावी ठरत असून शंभू ऑईल, शंभू मसाले, शंभू दाळ मिल अशी शंभू मिलची सर्वच उत्पादने अल्पावधीत कर्जतकरांच्या पसंतीस उतरली आहेत. गुणवत्ता आणि दर्जा कायम राखून, शंभू लाकडी घाणा निर्मित शुद्ध आणि दर्जेदार लाकडी घाणा निर्मित करडई तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, मोहरी तेल, खोबरे तेल, तीळ तेल, […]

Continue Reading

रुग्णांना जीवदान देणारे कर्जतचे ‘विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’

कर्जत शहरातील कुळधरण रोडच्या प्रभातनगर येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक आरोग्य सेवांसाठी ख्यातनाम आहे. एमडी, मेडिसिन २४ तास उपलब्ध असणारे कर्जत, जामखेड व श्रीगोंदा तालुक्यातील हे एकमेव हॉस्पिटल आहे. येथे २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध असून सर्व प्रकारच्या आकस्मिक उपचारांसाठी तत्पर व्यवस्था असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या या हॉस्पिटलने […]

Continue Reading

माळी महासंघ उद्योजक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रविंद्र दत्तात्रय अनारसे

कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव येथील संजीवनी उद्योग समूहाचे संचालक व उद्योजक रविंद्र अनारसे यांनी सामाजिक स्तरावर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची माळी महासंघाच्या वर्धापनदिनानिमित्ताने माळी महासंघ उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवड पत्रामध्ये जिल्हाध्यक्ष भूषण माधव भुजबळ यांनी म्हटले आहे, आपल्या सामाजिक कार्याचा व अनुभवाचा फायदा निश्चितच महासंघाच्या संघटना बांधणीसाठी होईल. १४ सप्टेंबर २०२४ […]

Continue Reading

डोळस कार्यकर्त्यांनी थोडे इकडे लक्ष द्या !

नेत्यांच्या दृष्टीने राजकारणात कार्यकर्त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याच्या यशाचा पाया हे कार्यकर्तेच रचत असतात. कार्यकर्ते हे जनतेच्या मैदानात उतरून प्रचार करतात, लोकांशी संवाद साधतात, आपल्या पक्षाचा, नेत्याचा संदेश घराघरात पोहोचवत असतात. मात्र, अनेकदा नेते हे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या काळातच विशेष महत्त्व देतात. निवडणुकीचा काळ सोडून कित्येक नेते हे कार्यकर्त्यांची अडचण, त्यांची मेहनत, […]

Continue Reading

‘लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, समूह साधन व्यक्ती, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि इतर कर्मचाऱ्यांचा सन्मान समारंभ जामखेड येथे पार पडला. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते यावेळी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता-भगिनींचे आ. […]

Continue Reading

भांबोरा व राक्षसवाडीतील आरोपींचे जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले

दिव्यांग व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून जमिनीची खरेदी-विक्री केली, म्हणून न्यायालयाच्या आदेशानंतर कर्जत पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या भांबोरा व राक्षसवाडी बुद्रुक येथील सर्व आरोपींचे जामीन अर्ज श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. ४ ) फेटाळले. बनावट दस्तऐवज करून फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, पांडुरंग केरु […]

Continue Reading

आरोग्य सेवेसाठी तत्पर – थोरात हॉस्पिटल

नागरिकांसाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी थोरात हॉस्पिटलने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संचालक डॉ. महेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहरानजीक वालवड रोडवर हे हॉस्पिटल अत्याधुनिक फिजिओथेरपी, न्यूरो रिहॅब सेंटर आणि जनरल केअर हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे. थोरात हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या आजारांवर तज्ञ उपचार उपलब्ध आहेत. मानेची आणि कमरेची चकती सरकणे, मणक्यात गॅप येणे, गुडघेदुखी, […]

Continue Reading

आ. रोहितदादांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज : बाळासाहेब कोऱ्हाळे

कर्जत- जामखेडचे आ. रोहित पवार हे मतदार संघासाठी लाभलेले एक समाजशील नेतृत्व आहे. कर्जत- जामखेड मतदारसंघाबरोबरच राज्यातील जनतेच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या आहेत, ज्यामुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत. त्यामुळे आपण खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, रोहितदादा […]

Continue Reading