प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किशोर कांबळे ; सचिवपदी प्रा. किरण जगताप

कर्जत येथील शासकीय विश्रामगृहात कर्जत तालुका प्रेस क्लबची वार्षिक बैठक रविवारी संपन्न झाली. मावळते अध्यक्ष प्रा. सोमनाथ गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीच्या सुरुवातीला मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर, चालू वर्षाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी किशोरकुमार कांबळे, उपाध्यक्ष म्हणून विनायक चव्हाण तर सचिवपदी प्रा. किरण जगताप यांच्यावर जबाबदारी […]

Continue Reading

सरपंच ते विधान परिषदेचे सभापती : संघर्ष, निष्ठा आणि जनसेवेचा प्रेरणादायी प्रवास

सरपंच ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती असा उंच भरारी घेणारा प्रवास म्हणजेच नामदार रामजी शिंदे साहेब. कोणताही राजकीय वारसा नसताना चोंडीसारख्या छोट्या गावात जन्म घेतलेल्या एका सामान्य सालकऱ्याच्या पोटी जन्मलेले रामजी शिंदे साहेब आज महाराष्ट्राच्या उच्च सभागृहाचे सभापती म्हणून राज्याच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवत आहेत. हा प्रवास म्हणजे संघर्ष, जिद्द, निष्ठा आणि समाजसेवेचे जिवंत […]

Continue Reading

बागल सर्विसेसमार्फत मोफत विमा मार्गदर्शन व प्रशिक्षण

कर्जत तालुका व परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा संदेश देताना बागल सर्विसेसचे सर्वेसर्वा व केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे सीनियर सेल्स ऑफिसर महेंद्र बागल यांनी सांगितले की आजच्या काळात प्रत्येक कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स करणे अत्यावश्यक झाले आहे. वाढते वैद्यकीय खर्च, अचानक होणारे आजार व अपघात यामुळे आर्थिक संरक्षणासाठी हेल्थ इन्शुरन्स हा सर्वात आवश्यक आधार आहे. महेंद्र बागल […]

Continue Reading

कर्जत- जामखेडमधील तुतारी मोकळी करणार : सुनील यादव

भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित सदस्य सुनील यादव यांनी रोहित पवार यांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. यादव यांनी म्हटले आहे, पाच – सहा वर्षांपूर्वी निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे रोहित पवार यांच्यासोबत होते. परंतु एका खोट्या प्रकरणात या दोघांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले गेले. हे दोघे सभापती राम शिंदे यांच्या संपर्कात गेल्यानंतर […]

Continue Reading

पुरोगामित्वाचा बुरखा : बोलण्यात प्रकाश, वागण्यात अंधार !

आज अनेकजण स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवून घेतात. पण खरे पुरोगामित्व फक्त बोलघेवडेपणात नसते तसेच ते घोषणांमध्ये किंवा कोणाला विरोध करण्यात नसते. विशेषतः राजकीय क्षेत्रात असलेल्या अनेकांकडून फक्त हिंदुत्वाला विरोध करणे म्हणजे पुरोगामी, असा भ्रम तयार केला जात आहे. त्यावरच त्यांची राजकीय दुकानदारी चालत असल्याचे दिसते. पुरोगामी विचार म्हणजे विचारपूर्वक, विवेकाने आणि समाजहिताच्या दृष्टीने आधुनिकतेची वाट धरून […]

Continue Reading

विश्वासाच्या नात्यातील दगाफटका

आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात, की त्यांच्याशी अनोखं नातं जुळतं. त्यामुळे आपल्या बोलण्यात, वागण्यात सहजपणा येतो, ती माणसं आपलीशी वाटू लागतात. आपण आपल्या स्वप्नांची, दुःखांची, अगदी मनातल्या गुपितांची उघडपणे चर्चा करू लागतो. त्यांच्यासमोर तुटकपणा दाखवायला आपल्याला भीती वाटत नाही. कारण त्यांच्यावर आपला विश्वास असतो. पण कधी कधी, ज्या माणसांना आपण मनापासून आपलं मानतो, त्यांच्याच […]

Continue Reading

माणसं ओळखण्याची कला !

दररोज आपण अनेक माणसांना भेटतो. काही हसतात, काही मदत करतात, काही फसवतात. सर्वांच्या चेहऱ्यावर असलेले भाव, बोलण्यातला गोडवा, वागणुकीमागचे हेतू हे खरे असतातच असे नाही. कुणी आपलं होऊन आपल्या भावनांशी खेळतं, तर कुणी शांतपणे आपल्यासाठी खंबीरपणे उभं राहतं. खरं तर, माणूस ओळखणं ही एक कठीण पण अत्यावश्यक कला आहे. ही कला शिकली नाही, तर आयुष्यात […]

Continue Reading

कर्जत नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ सेवेत सामावून घ्या

कर्जत ग्रामपंचायत कार्यकाळापासून स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारी महिलांनी आयुष्यभर तुटपुंज्या वेतनावर सेवा दिली. या महिला कर्मचाऱ्यांमध्ये लिलाबाई भाऊ कांबळे, कमल शिवाजी भिसे, विमल सुधाकर आखाडे, भामाबाई लष्मण भैलुमे यांचा समावेश आहे. तसेच, पूर्वी कार्यरत असलेल्या पार्वती ईश्वर कदम, सुशिला मारूती ओव्हळ आणि विमल मुरलीधर लोढे या स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही ग्रामपंचायत कालखंडापासून स्वच्छतेची जबाबदारी पार […]

Continue Reading

‘कर्जत लाईव्ह’च्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रा. किरण जगताप संपादित ‘कर्जत लाईव्ह’च्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे ट्रस्टी आप्पा अनारसे, मुख्याध्यापक गोरक्ष भापकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. सोमनाथ गोडसे, उदयसिंग राजपूत व […]

Continue Reading

ग्रामीण जनतेचे अज्ञान आणि बुवा- बाबांचा बाजार !

ग्रामीण भागातील समाज अजूनही अनेक बाबतीत पारंपरिक विचारसरणी आणि  अंधश्रद्धांवर आधारित आहे. शिक्षण तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, आर्थिक दुर्बलता, जीवनातील अनिश्चितता या आणि अशा घटकांचा ग्रामीण समाजावर मोठा परिणाम झालेला दिसतो. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, बुवा- बाबा, स्वयंघोषित गुरु आणि जादूटोणा करणारे लोक आपली मुळे खोलवर रुजवतात. त्यांच्या हातात चमत्कारी उपायांची जादूची कांडी आहे, अशी […]

Continue Reading