बागल सर्विसेस टीमची दमदार झेप; २८ सदस्य इंटरनॅशनलसाठी पात्र

बागल सर्विसेस टीमने २०२५–२०२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत २८ सदस्यांना आंतरराष्ट्रीय ट्रिपसाठी पात्र ठरवून मोठे यश मिळवले आहे. या यशस्वी सदस्यांना दुबई, मलेशिया, बुडापेस्ट (हंगेरी), रशिया, डेन्मार्क आणि इंडोनेशिया या देशांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. टीमच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि मजबूत टीमवर्क हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. तसेच बागल सर्विसेसचे […]

Continue Reading

तुकाराम मुंडे यांच्या बदलीविरोधात दिव्यांगांचा संताप

कर्जत तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या बदलीविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. दिव्यांगांच्या हक्कांसाठी सातत्याने काम करणारे आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेणारे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुंडे यांच्या बदलीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दिव्यांग बांधवांचे म्हणणे आहे की बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी […]

Continue Reading

आ. रोहित पवार ‘गायब’ असल्याच्या टीकेवर ‘राष्ट्रवादी’चे प्रत्युत्तर

कर्जत- जामखेड मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आरोप- प्रत्यारोपांचा जोरदार फड रंगला आहे. भाजपचे सुनील यादव यांनी आमदार रोहित पवार मतदारसंघातून चार महिन्यांपासून गायब असल्याची टीका करत राजकीय वातावरण तापवले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथील पदाधिकारी भूषण ढेरे यांनी यादव यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सुनील यादव यांनी आमदार रोहित पवार हे […]

Continue Reading

कर्जत तालुक्यात वाढतेय शिवसेनेची ताकद ; युवकांचा पक्षप्रवेश

कर्जत तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत असून नुकत्याच पार पडलेल्या एका प्रवेश सोहळ्यात अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तालुका शिवसेना प्रमुख नितीन तोरडमल तसेच कुळधरण गटाचे शिवसेना प्रमुख किरण घालमे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात सागर घालमे, अजय घालमे, अभिजित घालमे, सोमनाथ घालमे, राजेंद्र घालमे, कृष्णा घालमे, सौरभ […]

Continue Reading

थेरवडी तलावासाठी पाणी सोडण्याची मागणी; आत्मदहन आंदोलनाचा इशारा

कर्जत तालुक्यातील राशिन, तोरकडवाडी, थेरवडी, सोनाळवाडी व पिंपळवाडी परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर थेरवडी तलावात कुकडी आवर्तनातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.भाजपा तालुका उपाध्यक्ष पप्पूशेठ धोदाड यांनी तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी, कर्जत यांना निवेदन देत प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर तत्काळ कार्यवाही […]

Continue Reading

माधव जठार यांची युवासेना कर्जत तालुका प्रमुखपदी निवड

कर्जत तालुक्यात युवकांमध्ये सक्रियपणे काम करणारे तरुण कार्यकर्ते माधव जठार यांची युवासेना कर्जत तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव किरण साळी तसेच युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेकराजे […]

Continue Reading

महेश सटाले यांची आम आदमी पार्टीच्या युवा कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

आम आदमी पार्टीची राज्यस्तरीय आढावा बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महेश सटाले यांची आम आदमी पार्टीच्या अहिल्यानगर युवा कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्राचे प्रभारी प्रकाश जरवाल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फाटके, पक्षाचे प्रवक्ते मुकुंद […]

Continue Reading

मराठा समाजातील स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित स्थान मिळाले नाही

कर्जत–जामखेड मतदारसंघातील मराठा समाजात गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेतृत्वाच्या प्रश्नावर अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त होत आहे. गावपातळीवर भांडणे, जातीपातीचे राजकारण आणि स्वतःच्या आडनावाला मोठेपणा देण्याची स्पर्धा वाढल्याने समाजाची एकजूट कमकुवत झाल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर स्वतःला बादशहा म्हणवून घेण्याची प्रवृत्ती वाढली असली तरी समाजाचे एकत्रित नेतृत्व मात्र कमी होत […]

Continue Reading

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शिंदे येथील विजेचा प्रश्न मार्गी

कर्जत तालुक्यातील शिंदे येथे वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन तोरडमल आणि कुळधरण गटाचे शिवसेना प्रमुख किरण घालमे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून अवघ्या दोन दिवसांत वाफा डीपी बसविण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे परिसरात काही दिवसांपासून वीज पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः शेतीसाठी आवश्यक […]

Continue Reading

मार्चपूर्वी हेल्थ इन्शुरन्स घ्या ; प्रीमियम २० ते २५ टक्के वाढण्याची शक्यता : महेंद्र बागल

आरोग्य सेवांच्या वाढत्या खर्चामुळे येत्या काळात हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बागल सर्विसेसचे महेंद्र बागल यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मार्च महिना संपण्यापूर्वी आपल्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आरोग्य सेवांचा खर्च सातत्याने वाढत असल्याने विमा कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढत आहे. तसेच हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटीमध्ये […]

Continue Reading