‘तुकाई’ उपसा सिंचन योजनेसाठी ७.५० कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता

महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ‘तुकाई’ उपसा सिंचन योजनेसाठी ५९९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने ७ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तुकाई […]

Continue Reading

कार्यकर्त्यांची छाटणी करणारे खुरटे नेते !

राजकारणात नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा आधार लागतो. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच नेत्याचे नाव पुढे जाते. मात्र, काही नेते आपल्या कार्यकर्त्यांना पुढे येऊच देत नाहीत. कार्यकर्ता मोठा झाला, तर आपली ओळख पुसून जाईल, आपली जागा तो घेईल, अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे हे नेते कार्यकर्त्यांना विविध संधींपासून दूर ठेवतात. त्यांना महत्त्वाच्या बैठकींना बोलवत नाहीत, कार्यक्रमात सहभागी होऊ देत नाहीत. माध्यमांपासूनही […]

Continue Reading

कर्जत नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ सेवेत सामावून घ्या

कर्जत ग्रामपंचायत कार्यकाळापासून स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारी महिलांनी आयुष्यभर तुटपुंज्या वेतनावर सेवा दिली. या महिला कर्मचाऱ्यांमध्ये लिलाबाई भाऊ कांबळे, कमल शिवाजी भिसे, विमल सुधाकर आखाडे, भामाबाई लष्मण भैलुमे यांचा समावेश आहे. तसेच, पूर्वी कार्यरत असलेल्या पार्वती ईश्वर कदम, सुशिला मारूती ओव्हळ आणि विमल मुरलीधर लोढे या स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही ग्रामपंचायत कालखंडापासून स्वच्छतेची जबाबदारी पार […]

Continue Reading

गावातील राजकारण : सत्तासंघर्ष, कट्टरता आणि नव्या नेतृत्वावरील संकटे

अनेक गावातील राजकारण हे प्रामुख्याने दोन प्रमुख पक्षांच्या, राजकीय घराण्यांच्या सत्तासंघर्षावर आधारित असते. या पक्षांचे, घराण्यातील नेते हे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये राजकीय कट्टरता भासवतात. गाव नेते हे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांबाबत नेहमी विष पेरून एकमेकांमध्ये कटुतेचे वातावरण ठेवतात. त्यानुसार कार्यकर्ते हे नेत्याच्या आदेशाचे पालन करून विरोधकांच्या अंगावर जाऊन भिडतात. त्यातून दोन्ही नेते हे कट्टर विरोधक असल्याचे […]

Continue Reading

मृत्यूच्या दारातून पुनर्जन्म : विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या टीमचा यशस्वी प्रयत्न

कर्जतच्या बुवासाहेब नगर भागात सेंट्रिंगचे काम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेल्या सोनू कुमार पासवान (वय २४) याला बेशुद्ध अवस्थेत विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उत्तर प्रदेशातील मूळ गाव असलेल्या या रुग्णाच्या सिटी स्कॅन तपासणीत चेहऱ्यावर तीन ठिकाणी फ्रॅक्चर, नाकाच्या हाडाला फ्रॅक्चर आणि मेंदूच्या वरील आवरणामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. एवढ्या गुंतागुंतीच्या अवस्थेतही रुग्णावर तातडीने […]

Continue Reading

आ. रोहित पवार यांनी सभापतींना राजशिष्टाचार शिकवण्याची गरज नाही

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्या आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहिती नसावा, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी दिली आहे. पोटरे यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या निकालानुसार विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत प्रचार करू शकतात. त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी सभापतींना […]

Continue Reading

आ. रोहित पवार यांना राजकीय विकलांगता आली आहे

विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शिष्टाचार पाळावा, नाहीतर त्यांना तो विधानसभेच्या अध्यक्षांनी पाळायला लावावा, अशी टीका आ. रोहित पवार यांनी केली. त्यावर भाजपाचे तालुका सरचिटणीस पप्पूशेठ धोदाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. धोदाड यांनी म्हटले आहे, विधानसभा निवडणुकीत करोडो रूपयांचा चुराडा करून देखील केवळ हजार मताच्या फरकाने विजय मिळाल्यामुळे आ. रोहित पवार यांना […]

Continue Reading

श्रेयवादाची नुरा- कुस्ती अन् आ. रोहित पवारांचा शिष्टाचाराचा रडीचा डाव

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी शिष्टाचार पाळावा, नाहीतर त्यांना तो विधानसभेच्या अध्यक्षांनी पाळायला लावावा, अशी टीका आ. रोहित पवार यांनी केली. त्यावर भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खरमरे यांनी म्हटले आहे, सतत संविधानाचा दाखला देणारे आमदार रोहित पवार शिष्टाचारानुसार राज्यपालांनंतर विधान परिषद सभापतींचे पद येते, हे विसरत आहेत का? […]

Continue Reading

‘कर्जत लाईव्ह’च्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रा. किरण जगताप संपादित ‘कर्जत लाईव्ह’च्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे ट्रस्टी आप्पा अनारसे, मुख्याध्यापक गोरक्ष भापकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. सोमनाथ गोडसे, उदयसिंग राजपूत व […]

Continue Reading

कर्जतमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीचा थरार

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत- जामखेड मतदारसंघात प्रथमच प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी बांधण्यात आलेल्या मैदानाचे पूजन आ. रोहित पवार यांच्या हस्ते १५ मार्च रोजी होणार आहे. कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयाशेजारील मैदानावर सकाळी १० वाजता हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, कुस्तीपटू उपस्थित राहणार आहेत. […]

Continue Reading