भांडेवाडीतून आ. राम शिंदे यांना मोठे मताधिक्य देणार : धनंजय आगम

कर्जत तालुक्यातील भांडेवाडी येथील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीमध्ये एकत्र येऊन आमदार प्रा. राम शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस धनंजय आगम यांनी म्हटले, आमदार प्रा. राम शिंदे यांनी कर्जत मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी अनेक विकासकामे केली असून त्यांना या कामांची पावती म्हणून भांडेवाडी येथून […]

Continue Reading

भाजपाला मतदान करू नका, भीमेच्या पाण्याची शपथ : बाळासाहेब कोर्‍हाळे

कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा मूळ पाणीप्रश्न आजपर्यंत कर्जत-जामखेड तालुक्यात २५ ते ३० वर्षे सत्ता भाजपाची असूनही सोडवण्यात आलेला नाही. तालुक्यातील पाणीप्रश्न भाजपाचे नेतृत्व करणाऱ्या आमदारांनाही सोडवता आला नाही. मग भाजपाला मतदान का करावे? आपला मूळ प्रश्न आहे पाण्याचा, तो सोडवायचा असेल तर आ. रोहित पवार यांना निवडून दिले पाहिजे. सर्व नदीकाठच्या गावांनी लोकसभा निवडणुकीत […]

Continue Reading

कर्जत तालुका ‘युक्रांद’चा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर

माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी प्रणित युवक क्रांती दलाच्या कर्जत तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी कर्जत येथे झालेल्या आढावा बैठकीत चर्चा करून सर्वानुमते हा निर्णय घेतला. पोपटआबा खोसे, संघटक आप्पा अनारसे, तालुकाध्यक्ष प्रा. किरण जगताप, सचिव ॲड. शरद होले, राशीन शहराध्यक्ष दादा राऊत, तालुका संघटक विनोद सोनवणे, कार्यवाह […]

Continue Reading

घुले यांच्या वाढदिवसानिमित्त शंभू मसाले यांच्या शिपी आमटी मसाल्याचे सोमवारी लॉन्चिंग

शंभू मसाले यांच्या शिपी आमटी मसाल्याचे लॉन्चिंग सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी चार वाजता, तनपुरे सुपर मार्केट, कुळधरण रोड, कर्जत येथे होणार आहे. भाजप नेते पै. प्रविण दादा घुले यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० लिटर तयार केलेली आमटी लोकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. दैनंदिन जीवनात मसाले भाजी बनवण्यासाठी आवश्यक असतातच. कर्जत शहरात नावाजलेली शिपी […]

Continue Reading

मोजणी व्यवसाय क्षेत्रात भिसे बंधूंची यशस्वी वाटचाल

गेली अनेक वर्षे जमीन मोजणी क्षेत्रात कार्यरत असलेल्या बापूसाहेब भिसे व पांडुरंग भिसे या बंधूंनी आपला व्यावसायिक म्हणून लौकिक संपादन केलेला आहे. ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रामध्ये त्यांचे यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी आणखी एक मोजणी मशीन (Survey DGPS ) खरेदी केले […]

Continue Reading

‘शिवस्मित’कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस म्हणून साखर वाटप

कर्जत तालुक्यातील धालवडी येथील शिवस्मित दूध संकलन व शीतकरण केंद्राकडून सर्व उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी दिवाळीचा बोनस म्हणून साखर वाटप करण्यात आली. गोकुळ पवार यांच्या नेतृत्वाखाली या दूध संकलन केंद्राने त्यांच्याकडील दूध उत्पादकांना दिवाळी निमित्त शनिवारी बोनस वाटप केले. परंपरेनुसार याही वर्षी दिवाळी बोनस वाटप केल्यामुळे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्पादकांच्या […]

Continue Reading

धांडेवाडीतील शिवम दूध संकलन व शीतकरण केंद्राकडून प्रति लिटर ५० पैसे बोनस

पुढील वर्षासाठी १ रुपया प्रति लिटर दिवाळी बोनस देण्याची घोषणा कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथील शिवम दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादकांना या दिवाळीत ५० पैसे प्रति लिटर दिवाळी बोनस वाटप करण्यात आले. संकलन केंद्राचे चेअरमन बाबासाहेब धांडे यांच्या नेतृत्वाखाली या दूध संकलन केंद्राने त्यांच्याकडील दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त शनिवारी बोनसचे वाटप केले. पुढील वर्षी पराग मिल्क मंचर […]

Continue Reading

कर्जत-जामखेडच्या शाश्वत विकासासाठी राम शिंदे आवश्यक – सुदर्शन कोपनर

आ. प्रा. राम शिंदे २००९ साली पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी मतदारसंघात सातत्याने कामाचे झंजावात टिकवला आहे. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात मागील अनेक वर्षांचा कामांचा बॅकलॉग भरून काढण्यात ते यशस्वी ठरले असल्याची प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन कोपनर यांनी म्हटले आहे. अनेक वर्षांपासून कर्जत-जामखेडला उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची गरज भासत असे. परंतु राम शिंदे […]

Continue Reading

वायरमन अडसूळ यांना सेवेत रुजू करा

कर्जत तालुक्यातील कोरेगाव हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मोठे गाव आहे. येथील बहुसंख्य लोक शेतकरी आहेत. वीज हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लाईट गेल्यानंतर लगेचच तांत्रिक बिघाड झाल्यास वायरमन किरण अडसूळ हे त्वरित दुरुस्ती करतात. मात्र, काही कारणाने त्यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची उणीव जाणवू लागली आहे. कोरेगाव एजी आणि कोरेगाव गावठाण या […]

Continue Reading

जळकेवाडीतील भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कर्जत तालुक्यातील जळकेवाडी येथील माजी सरपंच मिनीनाथ नारायण मांढरे व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली व दिपकशेठ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. भारत मोहन देशमाने, रवींद्र जालिंदर पवार, यशवंत लहू मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. अनेक दशकांपासून भाजपामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक […]

Continue Reading