श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा : सभापती प्रा. राम शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांचे जीवन आणि त्यांच्या कार्याचे सर्व पैलू देशवासियांना एकाच ठिकाणी पाहता व अनुभवता यावेत यासाठी श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. चौंडी येथे श्री क्षेत्र चौंडी बृहत विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत […]

Continue Reading

शिंदे येथे ‘छावा’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन ; ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक पर्वणी

कर्जत तालुक्यातील शिंदे येथे उद्योजक संदीपशेठ घालमे यांच्या वतीने गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ ते १०.३० या वेळेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर ‘छावा’ चित्रपटाचे भव्य मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आठ बाय बारा फुटांच्या एलईडी स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जाणार असून, शिंदे येथील ग्रामस्थांना मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपट पाहण्याचा आनंद मिळणार आहे. हा कार्यक्रम […]

Continue Reading

एचपी माऊली पेट्रो स्टेशनला एक महिना पूर्ण ; २.१० कोटींची उलाढाल

कर्जत येथील राशीन रोडलगत दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या माऊली पेट्रो स्टेशनला आज एक महिना पूर्ण झाला आहे. माऊली पेट्रो स्टेशनचे संचालक अक्षय राऊत यांनी या एक महिन्यात ग्राहकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व ग्राहकांचे आभार मानले आहेत. माऊली पेट्रो स्टेशनमध्ये पेट्रोल व डिझेल खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एचपी पेमेंट अ‍ॅपद्वारे पेमेंट केल्यास […]

Continue Reading

कर्जत तालुक्यात आरटीई प्रवेशासाठी १२७ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. या अंतर्गत मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश दिला जातो. यासाठी लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी तालुकास्तरीय समिती काम करते. कर्जत तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी समितीकडून एकूण १२७ पात्र विद्यार्थ्यांच्या […]

Continue Reading

जगदंबा ट्रेडर्स अँड हार्डवेअर या नूतन व्यवसायाचा आज शुभारंभ

कर्जत तालुक्यातील कर्जत- नगर रोड येथील चांदे बुद्रुक चौक येथे मेजर विजय सूर्यवंशी यांच्या जगदंबा ट्रेडर्स अँड हार्डवेअर या नूतन व्यवसायाचा भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन आज मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. या दुकानात हार्डवेअरचे सर्व साहित्य उपलब्ध असणार आहेत. सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील, पत्रे, सिमेंट, […]

Continue Reading

‘आर्यन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर’चे मंगळवारी उद्घाटन 

कर्जत येथील कुळधरण रोड येथे संचालक सुनिल ढिसले यांच्या ‘आर्यन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर’ या नूतन व्यवसायाच्या भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. या दुकानात सर्व प्रकारचे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्राहकांना सोयीस्कर खरेदी करता येणार असून, या सुविधेचा त्यांना […]

Continue Reading

पळून जाऊन लग्न ! पालकांची मानसिकता बदलण्याची गरज

जीवन म्हणजे एक सुंदर प्रवास, जिथे प्रत्येकाला आपल्या मर्जीने निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, आपल्या समाजात अजूनही प्रेमविवाहाला दूषित नजरेने पाहिले जाते. विशेषतः पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुला- मुलींवर कठोर सामाजिक बंधने लादली जातात. हा विषय केवळ भावनिक नाही, तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. बदलत्या काळातही आपल्या मानसिकतेत पुरेसा बदल झालेला दिसत नाही. तरुण मुले- मुली […]

Continue Reading

मिरजगावात कुस्त्याचा फड रंगणार !

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील बाजार तळ येथे शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती केसरी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान सोमवार दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात पाच महाराष्ट्र केसरी तर तीन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान कुस्त्या खेळणार आहेत. यामध्ये ३ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. पहिली लढत पै. प्रकाश […]

Continue Reading

आजारी पडल्यावर वेळ निघून गेली असे होऊ नये : महेंद्र बागल

भारतात आरोग्य विम्याचा स्वीकार अत्यंत कमी आहे. केवळ ५% भारतीयांकडे आरोग्य विमा असल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठ्या आजारांवर किंवा अपघातांनंतर उपचारासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित असतो. अशावेळी रुग्णाच्या कुटुंबियांना विचारले जाते, “आरोग्य विमा आहे का?” मात्र, अनेक वेळा उत्तर नकारार्थी असते. परिणामी, कुटुंबियांना नातेवाईकांकडे मदतीसाठी […]

Continue Reading

घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण ; लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे : सभापती प्रा. राम शिंदे

महाआवास अभियान २०२४- २५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. कर्जत- जामखेड तालुक्यातील लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहावे व राज्य शासनाच्या अभियानात सहभाग घ्यावा. उपस्थित लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम, साहित्य आणि अन्य संबंधित विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी वेळेत घरकुल बांधकाम पूर्ण केल्यास उद्दिष्ट पूर्ण होण्यास […]

Continue Reading