आईसाहेबांचे हे वागणे सर्वांनाच खटकले !

आई ही सर्वांची सारखीच असते. तिच्या भावना आणि प्रेम हे समानच असतात. म्हणूनच आपण प्रत्येकजण आपल्या आईला एकेरी नावाने “ये आई” या पद्धतीने संवाद साधत असतो.मागच्या महिन्यात कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कर्जत आणि परिसरात चार वर्षे पूर्ण झाल्याने व गेल्या १४६० दिवसांपासून न थांबता श्रमदान करून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या या संघटनांच्या शिलेदारांनी […]

Continue Reading

कर्जत : महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण ; गुन्हा दाखल

कर्जत तालुक्यातील भांडेवाडी येथे राहत असलेल्या सत्येंद्र अनंतप्रताप सिंह, वय : ३३ वर्षे असून कर्जत येथे सहाय्यक अभियंता महावितरण पदावर कार्यरत आहेत. कर्जत येथील सोमनाथ कुलथे आणि शुभम कुलथे यांनी सिंह गचांडीला धरून तोंडावर चापटीने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सत्येंद्र सिंह यांनी अशी […]

Continue Reading

अळसुंदे विद्यालयात बालदिनानिमित्त अवतरले चाचा नेहरू

  

रयत शिक्षण संस्थेच्या अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा करण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बालकांविषयी प्रेमाच्या व वासल्याच्या भावना सर्वदूर सुपरिचित आहेत. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस भारतभर बालदिन म्हणून साजरा केला जातो.विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील गोरखे यांच्या वतीने विद्यालयातील इयत्ता आठवीच्या […]

Continue Reading

मतदारसंघातील भटक्या विमुक्तांचा आ. रोहित पवार यांना पाठिंबा

कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात आ. रोहित पवार यांना उपराकार लक्ष्मण माने यांच्या ‘भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र’ यांनी बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे. जामखेड येथील जाहीर सभेत कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्रचे सरचिटणीस नारायण जावलीकर व महाराष्ट्र उपाध्यक्ष रामकृष्ण माने यांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्या आदेशानुसार आ. रोहित पवार […]

Continue Reading

संभाजी ब्रिगेडने दिला आ. रोहित पवार यांना पाठिंबा

संभाजी ब्रिगेडने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकासआघाडीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे अहिल्यानगरचे उपजिल्हाध्यक्ष महादेव जाधव, कर्जत तालुकाध्यक्ष नवनाथ धनवे यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे राशीन शहर अध्यक्ष मुन्नाभाई मुंडे, संतोष […]

Continue Reading

जामखेडमध्ये भाजपला धक्का ; पांडुरंग माने पवारांच्या राष्ट्रवादीत

जामखेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस पांडुरंग माने यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. जामखेड येथे आयोजित सहकार मेळाव्यात माने यांनी आ. रोहित पवार यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला. यावेळी भाजपचे कट्टर कार्यकर्ते नितीन राऊत यांनीही राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली. माने हे राम शिंदे युवा मंचचे […]

Continue Reading

बहिरोबावाडीचे संघर्ष युवा प्रतिष्ठान आ. रोहित पवार यांच्यासोबत

कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील युवकांचे संघटन असलेल्या संघर्ष युवा प्रतिष्ठानने आ. रोहित पवार यांच्यासोबत मोठ्या ताकदीने उभे राहिले आहे. बहिरोबावाडी या गावातून आ. रोहित पवार यांना मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बिभीषण तोरडमल, दीपकशेठ शिंदे, भाऊसाहेब तोरडमल, रामेश्वर तोरडमल, रामअण्णा तोरडमल, राजू मेजर, अरुण लाळगे, आप्पा काळे, मनोज तोरडमल, युवराज तोरडमल, […]

Continue Reading

आ. रोहित पवारांच्या प्रचारार्थ संजय राऊतांची तोफ धडाडणार !

शिवसेनेची बुलंद तोफ आणि रोज सकाळी १० वाजता मिडियासमोर येऊन शिवसेनेचे फायरब्रॅड नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणि महाविकासआघाडीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित मताधिक्य मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. रोज मुंबईतून धडाडणारी त्यांची तोफ मंगळवारी सकाळी १० वाजता जामखेडमधून धडाडणार आहे. आ. रोहित […]

Continue Reading

भांडेवाडीतून आ. राम शिंदे यांना मोठे मताधिक्य देणार : धनंजय आगम

कर्जत तालुक्यातील भांडेवाडी येथील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीमध्ये एकत्र येऊन आमदार प्रा. राम शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस धनंजय आगम यांनी म्हटले, आमदार प्रा. राम शिंदे यांनी कर्जत मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी अनेक विकासकामे केली असून त्यांना या कामांची पावती म्हणून भांडेवाडी येथून […]

Continue Reading

भाजपाला मतदान करू नका, भीमेच्या पाण्याची शपथ : बाळासाहेब कोर्‍हाळे

कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा मूळ पाणीप्रश्न आजपर्यंत कर्जत-जामखेड तालुक्यात २५ ते ३० वर्षे सत्ता भाजपाची असूनही सोडवण्यात आलेला नाही. तालुक्यातील पाणीप्रश्न भाजपाचे नेतृत्व करणाऱ्या आमदारांनाही सोडवता आला नाही. मग भाजपाला मतदान का करावे? आपला मूळ प्रश्न आहे पाण्याचा, तो सोडवायचा असेल तर आ. रोहित पवार यांना निवडून दिले पाहिजे. सर्व नदीकाठच्या गावांनी लोकसभा निवडणुकीत […]

Continue Reading