सद्गुरू उद्योग समूहातर्फे दिवाळी बोनसचे वाटप

कर्जत येथील सद्गुरू उद्योग समूहातर्फे विविध व्यवसाय केले जातात, जसे सद्गुरू डेअरी, दूध संकलन, दूध शीतकरण, पेट्रोलियममध्ये श्री शिवशंकर पेट्रोलियम कर्जत, अरणगाव; बँकिंगमध्ये सद्गुरू मल्टीस्टेट कर्जत, माहीजळगाव; श्री संत गजानन महाराज पतसंस्था मिरजगाव; सद्गुरू मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट कर्जत; श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान मिरजगाव संचालित सद्गुरू कृषी महाविद्यालय; श्री शिवशंकर कृषी अभियांत्रिकी […]

Continue Reading

अलोट जनसागराच्या साक्षीने आ. रोहित पवारांनी भरला उमेदवारी अर्ज

हा कर्जत- जामखेडच्या विकासाचा अर्ज : बाळासाहेब कोऱ्हाळे कर्जत- जामखेडच्या गतिमान विकासाचा अजेंडा घेऊन आपल्या दमदार नेतृत्वाखाली आ. रोहित पवार यांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. कर्जत-जामखेडच्या तमाम जनतेच्या साक्षीने आ. रोहित पवार यांनी महाविकासआघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. या रॅलीला मिळालेल्या अलोट प्रतिसादाच्या जोरावर प्रत्यक्ष मतदानात देखील […]

Continue Reading

पारधी समाजाच्या मूलभूत सुविधांबाबत सकारात्मक भूमिका घेणाऱ्या उमेदवारास साथ

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार रोहित पवार यांना पारधी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. मोठमोठे मेळावे आयोजित करण्यात आले. त्यामध्ये विद्यमान आमदारांनी आश्वासन दिले होते की, मुख्यतः अतिक्रमण आणि गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू, तसेच समाजातील तरुणांना रोजगाराच्या आणि उद्योगधंद्याच्या संधी उपलब्ध करून देऊ. परंतु असे काही झालेले दिसत नाही. दोन आमदार आणि एक […]

Continue Reading

अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे कार्यकर्ते आ. प्रा. राम शिंदे यांचे ताकदीने काम करणार

भाजपा अनुसूचित जाती-जमाती मोर्चातील सर्व कर्जत-जामखेड कार्यकर्ते आणि सर्व बांधव आ. प्रा. राम शिंदे यांच्यासाठी येणाऱ्या विधानसभेत पूर्ण ताकदीने काम करतील. लोक आता भ्रमात पडणार नाहीत, आपली जनता सुज्ञ आहे, त्यामुळे आ.प्रा. राम शिंदे यांचा विजय निश्चित आहे. आ.प्रा. राम शिंदे विजय म्हणजे कर्जत-जामखेड मधील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. भाजपा अनुसूचित जाती-जमाती कार्यकारिणी जाहीर झालेली […]

Continue Reading

झिंजेवाडी जबर मारहाण प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला

कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी येथे दि २६ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या जबर मारहाणीत मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. मारुती झिंजे व यांचा मुलगा, पत्नी, बहिण,जावई, विहीन, मुलगी यांना मारहाण करणारे बारा आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती मारुती झिंजे यांनी दिली. झिंजे कुटुंबीयांच्या घरी येऊन काही समाजकंटकांनी […]

Continue Reading

सिद्धटेक हल्ल्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सिद्धटेक येथील वेदांत हॉटेल आणि मोबाईल शॉपीमध्ये १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. विजय तांदळे यांच्यावर हल्ला करणारे आठ आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला, असल्याची माहिती फिर्यादी विजय तांदळे यांनी दिली. विजय तांदळे यांच्या मालकीच्या वेदांत हॉटेल आणि मोबाईल शॉपी येथे झालेल्या […]

Continue Reading

कर्जत- जामखेड मतदारसंघातील लिंगायत समाजाचा मतदानावर बहिष्कार

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे वीरशैव लिंगायत समाज हा कायमचा रहिवासी असून लिंगायत समाजाची स्मशानभूमी गावालगत सिद्धेश्वर मंदिराशेजारी शेकडो वर्षांपासून आहे. त्या जागेची अधिकृत नोंद नसल्यामुळे येथील शेतकरी लिंगायत समाजाला दफनविधी करण्यासाठी अडवणूक करीत आहेत. आताच झालेल्या लिंगायत समाजाच्या व्यक्तीच्या दफन भूमीला तेथील शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना अडचण झाली. त्यामुळे त्यांना रस्त्यालगत दफनविधी करावा लागला. लिंगायत […]

Continue Reading

अखेर वनविभागाने पिंजरा लावला

कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुक येथे नागरिकांना शनिवारी रात्री बिबट्या आढळून आला. तीन दिवसांपासून कर्जत येथील वन विभागाला माहिती देऊनही अधिकाऱ्यांकडून कसलीच दखल घेण्यात आली नसल्याचे सरपंच पूजा सूर्यवंशी यांनी म्हटले होते. मात्र बिबट्याने शनिवारी दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण तयार झाले. त्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला. चांदे बुद्रुक येथे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी […]

Continue Reading