आपल्या रेहेकुरीचं काळवीट अभयारण्य !
नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे प्रामुख्याने काळवीट व इतर प्राणी आणि वनराईच्या संवर्धनासाठी अभयारण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. २९ फेब्रुवारी १९८० मध्ये काळविटांच्या संरक्षणासाठी निर्माण झालेले राज्यातील हे पहिलेच अभयारण्य आहे. येथील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात येते. खैर, हिवर, शिसम, बाभूळ, चंदन, बोर, कडुनिंब अशी कित्येक प्रकारची झाडे येथे आढळतात. कोल्हा, […]
Continue Reading