‘भाजपामध्ये जायला पाहिजे का ?’, ईडीने जप्ती आणताच आ. रोहित पवार यांनी …

कर्जत : प्रा. किरण जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकून चौकशी केली होती. याबद्दल रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी पाचारणही करण्यात आले होते. त्यानंतर आज ईडीने मोठी कारवाई केली आहे. ‘बारामती ॲग्रो लि.’ कंपनीची मालकी असलेल्या ‘कन्नड सहकारी कारखाना लि.’ या कारखान्याची १६१.३० एकर जमीन, प्लांट आणि यंत्र, इमारत इत्यादी जप्त केले आहे. या संपत्तीची एकूण रक्कम ५०.२० कोटी असल्याचे ईडीने सांगितले आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनीही एक्स अकाऊंटवर ट्विट करून याबाबत भूमिका व्यक्त केली आहे. तसेच भाजपामध्ये जायला हवं का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

ईडीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून याबाबत भाष्य केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून ‘बारामती ॲग्रो लि.’कडे अनधिकृतपणे ‘कन्नड सहकारी कारखाना लि.’ या कारखान्याची मालकी दिली गेली, असा आरोप ईडीने केला आहे.

या कारवाईनंतर रोहित पवार यांनीही त्यावर पलटवार केला आहे. “माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही दुसऱ्या एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. पण मी महादेवाचा भक्त आहे, अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. त्यावर #लडेंगे_जितेंगे असा हॅशटॅग रोहित पवार यांनी दिला आहे.

‘माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, असं दिसतंय’ असंही रोहित पवार म्हणाले.

माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?, अशी प्रतिक्रिया देऊन रोहित पवार यांनी स्माईलीची इमेज टाकली आहे. पण भाजपाने लक्षात ठेवाव. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय, असेही रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले, ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.