कुळधरणमध्ये चोरी ; सोन्याचे दागिने लंपास

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कुळधरण नजीकच्या थोरात वस्ती ( लोहार वस्ती ) येथे मंगळवारी ( दि. २) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास चोरी झाली. चोरट्याने घरात प्रवेश करून एक लाखाहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने लंपास केले.

राजेंद्र नामदेव थोरात यांच्या घरी ही चोरी झाली आहे. घरातील लोक कामानिमित्त बाहेर गेल्याचा फायदा उठवत चोरट्याने चोरी केली. स्थानिक युवकांना एकाचा संशय आल्याने त्याचा वीटभट्टीवर जावून शोध घेतला मात्र तो तेथे आढळून आला नाही.