फुले व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ‘ग्रंथप्रदर्शन व १४ तास अखंड वाचन उपक्रम

कर्जत : प्रा. किरण जगताप

दादा पाटील महाविद्यालयामध्ये
‘दि.१० एप्रिल ते १४ एप्रिल २०२३’ या कालावधीत महात्मा जोतीराव फुले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय, मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने महाविद्यालयात ‘ग्रंथप्रदर्शन व १४ तास सलग अखंड वाचन’ उपक्रमाचे आयोजन शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ रोजी महाविद्यालयाच्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ग्रंथालयामध्ये केले होते. या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

‘ग्रंथप्रदर्शन’ व सलग ‘१४ तास अखंड वाचन’ उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी मनोगतात सांगितले की, ग्रंथप्रदर्शनात मांडलेली विविध महापुरुषांची चरित्रे, यशस्वी व्यक्तींची आत्मचरित्रे हे विचारांचे भांडार आहे, हे ग्रंथ वाचून विद्यार्थ्यांना करिअरची दिशा मिळू शकेल. वाचनाची आवड स्वतःहून जोपासावी लागते. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी व समाज वाचनापासून काहीसा दूर चाललेला दिसतो आहे. १४ तास अखंड वाचन सारख्या उपक्रमांमुळे ग्रंथप्रदर्शन व वाचनाची सवय लागावी हाच एकमेव उद्देश या उपक्रमाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वाचनामुळे, शिक्षणामुळे घडले. त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधले. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी अंगिकारावेत, असा मौलिक संदेश आपल्या मनोगतातून दिला.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले की, पुस्तकांनी माणसाचे मस्तक घडते, ज्ञानाने, वाचनाने प्रेरणा निर्माण होते. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही असे सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय, मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाचे संयोजन ग्रंथालयाचे प्रा. बबन कुंभार व श्री. अनिल गांगर्डे, श्रीमती दिपाली भैलुमे या सहकाऱ्यांनी केले. याप्रसंगी प्रा. सुखदेव कोल्हे, डॉ. भारती काळे, प्रा. राम काळे, प्रा. कीर्ता वसावे, प्रा. हरिश भैलुमे, प्रा. सीमा डोके, प्रा. जयदीप खेतमाळीस, प्रा. सौ. मीना खेतमाळीस, प्रा. टी. एन. शेख, प्रा. सौ. एस. एस. भोसले आदि प्राध्यापक उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी व इतर विभागांचे बहुसंख्य विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बबन कुंभार यांनी केले.