पांडुरंग धोदाड यांचे निधन

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथील पांडुरंग हरीबा धोदाड यांचे गुरुवारी ( दि. ४) वृद्धाकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कुंभेफळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

रिलायबल ॲग्रोचे संचालक भाऊसाहेब धोदाड व भाजपचे युवा मोर्चाचे कर्जत तालुका सरचिटणीस पप्पूशेठ धोदाड यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.