राशीनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन येथील संत रोहिदास नगर येथे डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी सात वाजेपासून रोहिदास नगरमधील भीमसैनिकांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.

प्रतिमापूजन कार्यक्रमासाठी श्याम कानगुडे, भीमराव साळवे, रामकिसन साळवे, अतुल साळवे ,सचिन साळवे, दीपक थोरात, संदीप सोनवणे, दत्ता सोनवणे, गंगासागर सोनवणे, विनोद सोनवणे, महादेव सोनवणे उपस्थित होते.