कर्जतच्या निवडणूक प्रचार नियोजन बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहा

कर्जत : प्रा. किरण जगताप

अहिल्यानगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपने कंबर कसली आहे. कर्जत तालुक्यामधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कुळधरण रोड येथे बैठक पार पडणार आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव यांनी केले आहे.

यादव म्हणाले, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा पक्षाने खासदारकीची उमेदवारी दिली आहे. डॉ सुजय विखे यांच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपने तालुकानिहाय बैठका हाती घेतल्या आहेत. पहिली बैठक जामखेड येथे मंगळवारी पार पडणार आहे. दुसरी बैठक कर्जतमध्ये पार पडणार आहे. आ. प्रा. राम शिंदे व उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत येथील बैठक पार पडणार आहे.

या बैठकीसाठी सर्व आजी – माजी पदाधिकारी, कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा व तालुका मोर्चा व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, महिला तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व आघाड्यांच्या महिला पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी, वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख, बुथप्रमुख यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कर्जत तालुका भाजपा व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.