कर्जतमध्ये सामाजिक संदेशातून महामानवास अभिवादन

कर्जत : प्रा. किरण जगताप

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कर्जत शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. कर्जत शहराच्या प्रमुख चौक छञपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी व रस्त्यावर उभारण्यात आलेल्या विविध संदेशातुन सर्वाचे लक्ष वेधले. भीम ध्वज, सुरेल आवाजात सुरू असलेले भीम गीत छञपती शिवाजी महाराज चौकात केलेली विद्युत रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.

डॉ. बाबासाहेब यांची आकर्षक मुर्ती आणि त्यावर केलेली फुलांची आरास फटाक्यांची आतषबाजी भास्कर भैलुमे मिञ मंडळाच्या वतीने कर्जतमधील छञपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी केलेल्या सजावटीने प्रतिमा पुजन व बुध्द वंदनेसाठी सामील झालेल्या मोठ्या संख्येने भीमसैनिकामुळे वातावरण भारावुन गेले होते.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई छञपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली होती. शहरातील भीम अनुयायी आणि प्रेमींनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात छञपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी गर्दी केली होती.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सुनिल शेलार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल मेहेञे, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, रविंद्र सुपेकर, गटनेते संतोष मेहेञे नगरसेवक अमृत काळदाते, नगरसेविका प्रतिभा भैलुमे, छाया शेलार, ज्योती शेळके नगरसेविका अश्विनी दळवी व आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अनुराग भैलुमे, निलेश भैलुमे, सचिन धेंडे, सचिन गोरे, बाळासाहेब समुद्र, रावसाहेब खराडे, अलताफ झारेकरी, सुमित भैलुमे, किरण भैलुमे, सुरेश गोरे, संतोष जाधव, राजेंद्र येवले, अश्रय क्षिरसागर, मनोज राऊत, किशोर कांबळे, सुरज कदम, राजेंद्र भैलुमे, सुशांत भैलुमे व आदींनी परिश्रम घेतले.