कर्जतमध्ये विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत शहरातील बुवासाहेब नगर येथे रूमवर राहणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. वैष्णवी शिवाजी खिळे, मूळ रा. बेलगाव कानडी असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. चौथ्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत ओढणीने गळफास घेवून तिने जीवनयात्रा संपवली.

https://www.sai.org.in/en/sai-video-popup

आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार रवींद्र वाघ, भांडवलकर व कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.