आ. प्रा. राम शिंदे व आ. मोनिकाताई राजळे धर्मादाय रूग्णालय समितीवर

कर्जत : प्रा. किरण जगताप

धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करून देण्याकरिता गठीत जिल्हास्तरीय समितीवर आमदार प्रा. राम शिंदे व आ. मोनिकाताई राजळे व इतर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय विधी व न्याय विभागाने जारी केला आहे.

धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित खाटा पारदर्शी पध्दतीने निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यस्तरीय विशेष मदत कक्षास सहाय्य करण्यासाठी विधि व न्याय विभागाच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेली जिल्हास्तरीय समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे.

या समितीवर जिल्ह्यातील विधानसभा, विधानपरिषद सदस्य, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक समाजसेवक, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांची नियुक्ती विधि व न्याय मंत्री यांच्या मान्यतेने करण्याची तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार आमदार प्रा. राम शिंदे यांची जिल्हास्तरीय समितीवर निवड करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती कार्यरत असणार आहे. विधी व न्याय विभागाने १४ मार्च २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हास्तरीय समितीवर आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, गिरीश कुलकर्णी, डाॅ अशोक इथापे, डाॅ सुहास शंकरराव घुले यांची निवड करण्यात आली आहे.