माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्हाचा विरोधकांचा डाव फसला : फरांडे

कर्जत : प्रा. किरण जगताप

निवडणुकीसाठी माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्हाचा विरोधकांचा डाव फसला आहे. उलट १७. ० ने पॅनल विजयी झाला. असे पारनेर सैनिक बैंकेचे शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे यांनी म्हटले आहे. कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

फरांडे यांनी पुढे म्हटले आहे, कर्जत शाखा येथे सन २०२० रोजी बँकेचे कर्मचारी नितीन सुंदर मेहेर याने हनुमंत ज्ञानदेव नेवसे, विशाल मधुकर पवार या दोन व्यक्तींना हाताशी धरुन कोरोना काळाचा फायदा घेत बँकेत खाते उघडले.आणि जिओ व इतर कंपनीचे व वेगवेगळया नावाचे चेक बँकेत नितीन मेहेर यांच्यामार्फत जमा केले. ते चेक एडीसीसी बँकेला जमा करुन जमा झाल्याचे कागदपत्र बँकेचे उपशाखा व्यवस्थापक दिपक पवार यांच्या मार्फत जमा केले.

यामध्ये नितीन मेहेर, विशाल पवार, हनुमंत नेवसे या तिघांनाच याचा लाभ झाल्याचे तपासात सिध्द झाले आहे. परंतु विरोधकांनी निवडणूक डोळयासमोर ठेऊन काही प्रतिष्ठीत व्यक्तींच्या नावाचा वापर करुन ऑडीटर यांच्याबर दबाव आणून माझे नाव या गुन्ह्यात घेण्यास भाग पाडले. तसे पाहता उपशाखा व्यवस्थापक यांना पुर्ण अधिकार दिले होते माझ्याकडे विशेष वसुली अधिकारी म्हणून कर्जत- जामखेडचा चार्ज होता. माझी कोणत्याही कागदपत्रावर सही नाही किंवा माझा आयडी नाही. संपूर्ण कामकाज हे उपशाखा व्यवस्थापक आणि क्लार्क यांनी केले आहे.

एकुण १० चेक जमा केले आहेत. त्यापैकी नितीन मेहेर- ८, रेश्मा मन्यार – १ बाबासाहेब साळवे- १ उपशाखा व्यवस्थापक दिपक पवार यांनी १० चेक पास केले आहेत. बँकेचे सिनीयर ऑफीसर सुनिल आंग्रे यांच्यामार्फत ऑडीट केले असता नितीन मेहेर हा त्यांच्या गावचा असल्यामुळे त्यांनी त्याला वाचवण्यासाठी मला टार्गेट केले. डबल अहवाल दाखल केला त्यामुळे संभ्रम तयार करुन दिला. ज्या कंपनीचे पैसे गेले त्यांचे काही म्हणणे नाही व तसा त्यांनी अर्ज देखील दिला नाही या प्रकरणी बँकेचे कोणतेही नुकसान झाले नाही

विरोधकांनी निवडणूक डोळयासमोर ठेऊन कर्जतला जर मते मिळवायची असेल तर फरांडे यांना कसल्याही प्रकरणात गुंतवण्याची गरज आहे. म्हणून बँकेचे गद्दार कर्मचारी अरुण थोरात यांच्यामार्फत बँकेची संपूर्ण माहिती विरोधक घेत असत व त्याप्रमाणे कामकाज करतात. तब्बल १ वर्ष निवडणुक जवळ आल्यावर माझे नाव गुन्ह्यातील पुरवणीमधे घेण्याचा विरोधकांचा डाव सफल झाला. पण ज्या कारणासाठी माझे नाव यामध्ये घेण्यात आले ते त्यांचे उद्दिष्ट साध्य झाले नाही.

सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे मी स्वतः २१ मार्च रोजी गुन्हे शाखा, अहमदनगर या ठिकाणी ११ वाजता हजर होण्याचा निर्णय घेतला आहे. मला अटक झालेली नसून मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जात आहे. मला अटक होण्यासाठी माजी संचालक सुदाम कोथिंबिरे, विनायक गोस्वामी, चंदू पाचारणे, अशोक गंधाक्ते व आजी माजी संचालक यांनी डाव केला आहे. त्यांना नितीन मेहेर यांच्याकडुन लाभ झाला आहे. माझ्याकडून लाभाची अपेक्षा ठेवतात, असेही फरांदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.