सामान्य जनतेची पिळवणूक व अडवणूक कराल तर … : सागर लोंढे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- जामखेडमध्ये दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. यासाठी शासकिय यंत्रणा कमी पडत असून त्याची पूर्तता करण्यासाठी आ. रोहित पवारांच्या माध्यमातुन कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेने पाणी वाटप करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागीतली होती. परंतु आचारसंहितेचे कारण देऊन ती नाकारण्यात आली.

पाण्यासारखे पुण्य नाही, अस अध्यात्म सांगते, जल है, तो कल है, हे सरकार सांगते. पाणी म्हणजे जीवन हे पर्यावरण अभ्यासक सांगतात, आणि याच पाण्यावर काम करणाऱ्या पाणी फाउंडेशन या संस्थांचा पुरस्कार सरकार करत आहे. मात्र कर्जत- जामखेडमध्ये काल एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून अवर्षण प्रवन वर्गात मोडत असलेले हे दोन्ही तालुके कुकडी आणि घोड या कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तेही वेळेवर मिळत नाही, आणि म्हणून जानेवारीपासूनच पाण्याची भीषण टंचाई या दोन्ही तालुक्यात असते. शेती सोडाच पण जनावरे आणि माणसांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागते. कित्येक दिवस सरकार दरबारी हेलपाटे मारावे लागतात. आणि तरीही पाणी मिळतच असे नाही.

गेली सलग २५ वर्षापासून भाजपाचा आमदार येथे प्रतिनिधित्व करत आहे. आमदार, खासदार, बारा खात्याचे मंत्री, पण पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. कदाचित भाजप नेतृत्वाला त्याची गरज वाटली नसावी. आणि म्हणून विकासाच्या इतर योजना सोडाच पण पाण्याचा प्रश्न जसाच्या तसा आ वासून उभा आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जवळपास दीड वर्ष, रोहितदादा पवार. कर्जत जामखेडचा संपूर्ण दौरा करून येथील पाण्याच्या, प्रश्नावर अभ्यास केला आणि यावर कायमस्वरूपी कशा उपाययोजना करता येतील, यासाठी प्रयत्न चालू केले. शेती सोडाच पण पिण्यासाठी पाणी नाही म्हणून स्वखर्चाने, निवडणुकीपूर्वी गावोगाव गरज भासेल तसे टॅंकर चालू केले. कर्जत- जामखेडच्या प्रश्नाची जाण असलेला एक युवा नेता म्हणून कर्जत जामखेडकरांनी मोठ्या मताधिक्याने रोहितदादांना निवडून दिले. २०१९ पासून आजपर्यंत कर्जत, जामखेडला ज्या ज्या वेळी पाण्याचे आवश्यकता पडली. त्या त्या वेळी आमदार रोहितदादा पवार यांनी, सरकारची वाट न बघता स्वखर्चाने जनावरे आणि लोकांची तहान भागवण्याचे काम केले. पण आज एक दुर्दैवी निर्णय शासनाकडून काढण्यात आला. रोहितदादांनी स्वखर्चाने चालू केलेले पाण्याचे टँकर बंद करायला सांगितले.

एकीकडे राज्य अडचणीत असताना, सरकार आणि शासन सामाजिक संस्थांना आवाहन करतं की जमेल ती मदत करा. कर्जत जामखेड मध्ये वेगळाच पॅटर्न चालू झाला आहे आडवा आडवी पॅटर्न, माणसे पराभूत होतात परंतु पराजयाचा वचपा जनतेला अडचणीत आणून काढला जातो, हे फक्त कर्जत जामखेडलाच पाहायला मिळते. सरकार दरबारी असणारा वशिला राज्याच्या मोठ्या नेत्याची मेहरबानी, याचा फायदा कर्जत जामखेडला होण्यापेक्षा तोटाच जास्त दिसतोय. आणि हे कधीही झाकून राहिले नाही. १०० कोटींच्या विकासकामांना दिलेली स्थगिती, ज्या कर्जत- जामखेडकरांचा हजारो शेतकऱ्यांचा ऊस बारामती ॲग्रोला जातो त्या कारखान्यावरच कारवाई करा. म्हणून केलेली धडपड, पण आपल्याच पक्षाच्या हिरडगाव कारखान्यांनी वर्षानुवर्ष अडवून ठेवलेले शेतकऱ्यांच्या ऊस बिलांसाठी, कधीही चकार शब्द काढला नाही. अनेक वर्ष शेतात जाणारे रस्ते याला ऊर्जेत अवस्था यावी म्हणून प्रभावीपणे राबवलेली पांदण रस्ते योजना, त्याच्याही चौकशी करून बंद पाडण्याचे काम केले, या योजना प्रभावीपणे राबवल्या म्हणून येथे चांगले काम करणाऱ्या माझे किती सरकार दरबारी वजन आहे हे दाखवण्यासाठी, अधिकाऱ्यांचे निलंबन असो अथवा बदल्या केल्या गेल्या.

महाराष्ट्रात विकासाच्या बाबतीत औद्योगिकीकरणाच्या बाबतीत कर्जत- जामखेड हा कितीतरी पटीने मागे आहे. परंतु आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होता. त्याचाच भाग म्हणून कर्जत- जामखेडच्या महत्त्वाकांक्षी आणि युवांना रोजगार देणाऱ्या एमआयडीसीसारखा प्रश्न आमदार रोहितदादा यांनी जवळपास निकाली काढला होता. फक्त त्याचा श्रेय रोहितदादांना जाईल म्हणून एमआयडीसी रद्द करण्याचे पाप तुमच्या हातून केले गेले.

कर्जत – जामखेडच्या तरुणांच्या हाताला काम मिळण्यापेक्षा. तुम्हाला तुमचे राजकारण महत्त्वाचे वाटले. काहीही म्हणा. भाजपच्या मनुवादी विचारांचा पगडा तुमच्यावर चांगलाच पडलेला दिसतोय वाण नाही पण गूण तुम्हाला लागलाच. जलसंधारणासारखे महत्त्वाचे खाते असताना जर कर्जत जामखेडमध्ये पाण्यावर काम केले असते. तर रोहितदादांनी चालू केलेले टँकर बंद करायची पाळी तुम्हाला आलीच नसती. किमान नावाप्रमाणे तरी वागा. वरून जर प्रभू राम बघत असतील तर काय म्हणत असतील. समस्त कर्जत- जामखेडकरांच्यावतीने तुम्हाला हात जोडून विनंती सरकारी दरबारी असणारे वजन लोकांचे प्रश्न निर्माण करण्यासाठी नाही तर सोडवण्यासाठी तरी करा. नाहीतर तुम्हाला कर्जत जामखेडकरांनी ओळखलेच आहे आडवा आडवीच्या राजकारणात. २०२४ ला लोक तुम्हाला आडवे केल्याशिवाय राहणार नाहीत.